घरदेश-विदेशअंजलीची मैत्रीण करायची गांज्याची विक्री; दोघींचे झाले होते कडाक्याचे भांडण

अंजलीची मैत्रीण करायची गांज्याची विक्री; दोघींचे झाले होते कडाक्याचे भांडण

Subscribe

निधीला ६ डिसेंबर २०२० रोजी आगरा स्थानकावर पोलिसांनी अटक केली होती. तिच्याकडे १० किलो गांजा सापडला होता. याप्रकरणात तिला जामीनही मंजूर झाला आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. 

नवी दिल्लीः जीपने जवळपास १३ किमी फरफटत नेल्याच्या घटनेत दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अंजलीची मैत्रीण निधी गांज्याची तस्करी करायची, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

निधीला ६ डिसेंबर २०२० रोजी आगरा स्थानकावर पोलिसांनी अटक केली होती. तिच्याकडे १० किलो गांजा सापडला होता. याप्रकरणात तिला जामीनही मंजूर झाला आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

दिल्लीतील कांजवाला येथे बोलेरो जीपने अंजलीच्या स्कुटीला धडक देऊन अंजलीला खाली पाडले. जीपमध्ये अडकलेल्या अंजलीला जीपने १३ किमी फरफटत नेले. यात अंजलीचा मृत्यू झाला. अपघातात अंजलीच्या अंगावरील सर्व कपडे फाटले. अंजलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी तपास करत तरुणीला धडक देणाऱ्या जीपमधील पाच आरोपींना अटक केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने करुन या घटनेतील आरोपींना अटक केली.

अंजलीला जीपने फरफटत नेल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्याआधारवरही पोलिसांनी तपास केला. अपघातातील मृत तरुणी अंजली सिंह न्यू इअर पार्टीवरून घरी परतत असताना तिच्या स्कूटीवर मागे एक मुलगी बसली होती. निधी असे त्या मुलीचे नाव असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. जीपने धडक देताच मृत तरुणी अंजली आणि तिची मैत्रीण निधी खाली कोसळली, स्कूटीवरून खाली पडताच अंजली जीपच्या चाकात अडकली, जीप अंजलीला फरफटत घेऊन जात असल्याचे पाहून निधी बिथरली आणि ती घटनास्थळावरून घरी निघून गेली, असे पोलीस तपासात उघड झाले.

- Advertisement -

त्यानंतर पोलिसांनी निधीचीही माहिती गोळा केली. निधीवर गांजा तस्करीचा आरोप असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेआधी अंजली व निधीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. पैसे देण्यावरुन हे भांडण झाले होते, असे अंजलीच्या मित्राने पोलिसांना सांगितले. या घटनेतील कार मालक व अन्य एक जण पोलिसांना शरण आला आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -