घरताज्या घडामोडीसावरकरांशी लढायचे की मोदींशी हे ठरवा, गोंधळ नको; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भूमिका

सावरकरांशी लढायचे की मोदींशी हे ठरवा, गोंधळ नको; विरोधी पक्षनेत्यांनी घेतली भूमिका

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या सततच्या वक्तव्यांमुळे देशातील राजकारण तापले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या सततच्या वक्तव्यांमुळे देशातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आपल्याला सावरकर यांच्याशी लढायचं आहे की, नरेंद्र मोदींशी लढायचे. हे ठरवा, गोंधळ नको, अशी भूमीका जवळपास सर्व विरोधी पक्षनेत्यांनी घेतली माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. (Decide whether to fight Savarkar or Modi no confusion Opposition leaders took the stand)

दिल्लीत प्रसारमाध्यमांशी खासदार संजय राऊत यांनी बातचीत केली. त्यावेळी संजय राऊत यांना काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वारंवार काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आमचे काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा झाली आहे”.

- Advertisement -

“काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळपास सर्वच विरोधीपक्षनेते उपस्थित होते. त्यावेळी या विरोधी पक्षनेत्यांनी सावरकर यांच्या मुद्दा काढण्याची गरज नाही. आपल्याला सावरकर यांच्याशी लढायचं आहे की, नरेंद्र मोदींशी लढायचे. हे ठरवा, गोंधळ नको, अशी भूमीका घेतली आहे”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, एकीकडे भाजपा आक्रमक झाला आहे तर, दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाराज आहेत. वारंवार सावरकरांवर होत असलेल्या अपमानामुळे उद्धव ठाकरे यांनी तर काँग्रेससोबतची युती तोडण्याचा इशारा देत सावरकरांचा होणारा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचेही सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ 5 मुद्द्यांमुळे राहुल गांधींना महाराष्ट्रात धोक्याचे ठरू शकते सावरकरांवरील राजकारण; जाणून घ्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -