दिल्ली कोर्टाकडून जामीन मिळताच दीप सिद्धूला पुन्हा लगेचच अटक

Deep Sidhu arrested after Delhi court granted him bail in Red Fort violence case
दिल्ली कोर्टाकडून जामीन मिळताच दीप सिद्धूला पुन्हा लगेचच अटक

दिल्लीच्या लाल किल्ला हिंसा प्रकरणातील आरोपी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे. आजच दीप सिद्धूचा दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला होता. अभिनेता दीप सिद्धू आणि गँगस्टर-सामाजिक कार्यकर्ता लक्खा सिधाना यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ ए नुसार मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. आज ३० हजारांच्या जात मुचलक्यावर दीप सिद्धूला जामीन मिळाला होता. पण आता पुन्हा त्याला अटक करण्यात आली आहे.

केंद्राने लागून केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्या दरम्यान २६ जानेवारीला दीप सिद्धसह काही आरोपींनी दिल्लीत हंगामा करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ला परिसरात हिंसाचार झाला. यामध्ये दीप सिद्धूचा हात होता. त्यामुळे याप्रकरणात त्याला मुख्य आरोपी असल्याचे म्हटले आहे. या हिंसाचारामध्ये ५०० पोलीस जखमी झाले असून एका आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ९ फेब्रुवारीला दीप सिद्धूला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर भडकवण्यासहित अनेक आरोप लावले गेले आहेत. आज दिल्ली कोर्टाने ३० हजाराच्या जात मुलक्यावर दीप सिद्धचा सशर्त जामीन मंजूर केला. कोर्टाने जामीन देताना अटी घातल्या. या अटींच्यानुसार सिद्धूला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावे लागेल. पासपोर्ट जमा करावा लागले. फोन नंबर बदलावा लागले आणि हिंसाच्या पुराव्यांसोबत कोणत्याही प्रकारची छेडछेडा झाली नाही पाहिजे, अशा अटी घातल्यात आल्या. परंतु जामीन मिळताच काही तासात त्याला पुन्हा एकदाचा अटक करण्यात आली आहे.

दरम्यान ८ एप्रिलला झालेल्या सुनावणीत दीप सिद्धूने स्वतःला निर्दोष असल्याच सांगितले होते आणि याप्रकरणात जामीन देण्याची विनंती केली होती. सिद्धने सांगितले होते की, त्याची फसवणूक करून त्याला या प्रकरणात सामील केले आहे. तर तक्रारदाराने जामीनावर आक्षेप घेत दीपला मुख्य आरोपी असल्याचे सांगितले होते.


हेही वाचा – लालू प्रसाद यादव यांना जामीन; साडेतीन वर्षानंतर तुरूंगातून होणार सुटका