घरताज्या घडामोडीरणवीर, दिपिका सुट्टीवर, शेअर केला फोटो

रणवीर, दिपिका सुट्टीवर, शेअर केला फोटो

Subscribe

बॉलीवूडचे क्यूट कपल दीपिका आणि रणवीर सध्या सुट्टीवर आहेत. दिपिकाने शुक्रवारी रणवीरच्या पासपोर्टचा एक फोटो शेअर केला होता. #his&her #vacation’ असं त्याखाली लिहलं. आम्ही दोघ सुट्टीवर जात असल्याचे तिने त्यात म्हटले होते. आता तिने त्यांचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

पण दोघे नक्की कुठे फिरायला गेले आहेत. ते सांगण मात्र दिपिकाने टाळले आहे. पण फोटो बघितल्यावर दोघं बीचवर असल्याचे दिसतयं. दिपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शे्अर केले आहेत. यात समुद्र किनाऱ्याच्या वाळूत दोघांच्या स्लिपर दिसत आहेत. त्याखीली दिपिकाने तिच्या रणवीरबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.मी नेहमी तू दाखवलेल्या मार्गावरूनच चालेल. असं तिने म्हटले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

दिपिका रणवीरचे फोटोंना चाहतेही मनापासून लाईक करत असून आतापर्यंत ११ मिलियन लोकांनी त्यांना लाईक केले आहे. सध्या हे दोघे ८३ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच दिपिका रणवीर एकत्र काम करत असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. नोव्हेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -