घरदेश-विदेशDeepika Padukone : दीपिका पदुकोणने 'या' कारणासाठी केले पंतप्रधानांचे कौतुक

Deepika Padukone : दीपिका पदुकोणने ‘या’ कारणासाठी केले पंतप्रधानांचे कौतुक

Subscribe

मुंबई – बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) तिच्या ‘फायटर’ (Fighter) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. याशिवायही तिने दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे देखील ती चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन दीपिकाला फारच भावले आहे. आणि त्यासाठीच तिने मोदी यांचे कौतुक केले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश होतो. काही दिवसांपूर्वीच आलेला ‘फायटर’ हा चित्रपट हिट ठरलाय. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिकेत आहे. आता दीपिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पंतप्रधान मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम पाहून ती प्रभावित झाली. यासाठी दीपिकाने खास पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Prashant Kishor : मोदींनंतर भाजपाचे नेतृत्व कोणाकडे? प्रशांत किशोर म्हणतात…, तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल

दीपिकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्यात ती म्हणते, ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले खूप खूप आभार. परीक्षेचा ताण टाळण्यासाठी तुम्ही शाळेतील मुले, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी ज्या पद्धतीने संवाद साधला ते कौतुकास्पद आहे’. यासोबतच दीपिकाने पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा ‘ कार्यक्रमाची लिंक देखील शेअर केली आहे. दीपिकाच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केलं. मोदींनी देशातील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी अनेक टिप्स दिल्या. मोदींनी केवळ विद्यार्थ्यांशीच नाही तर शिक्षक आणि पालकांशीही संवाद साधला. याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. त्यात त्यांनी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कोणती काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी पंतप्रधान साधत असलेला संवाद हा सर्वांनाच भावतो. सगळ्यांसाठीच तो चर्चेचा विषय आहे. मोदींचा तो प्रेरणादायी संवाद नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

हेही वाचा – Gyanvapi: ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू राहणार; अलाहाबाद हायकोर्टाकडूनही मशीद समितीला दणका

दोन दशकांहून अधिक काळ दीपिकानं तिच्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांना जिंकून घेतले आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचे नाव आघाडीवर आहे. तसेच सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या यादीतही दीपिकाचे नाव आहे. ग्लोबल स्टार म्हणून दीपिकाची वेगळी ओळख आहे.

‘फायटर’ सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास, यात दीपिकाने स्क्वॉड्रन लीडर मीनल राठोडची भूमिका साकारली आहे. या सिनेमातील दीपिकाच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले आहे. ‘फायटर’ हा सिनेमा पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर पाकिस्तानवर कसं हवाई हल्ला करतं हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. तसेच या चित्रपटाने आतापर्यंत 145 कोटींची कमाई केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -