घरदेश-विदेशHeeraben Modi Demise... हीराबेन मोदी यांच्या निधनामुळे अतीव दुःख, मुख्यमंत्री शिंदेंकडून शोक

Heeraben Modi Demise… हीराबेन मोदी यांच्या निधनामुळे अतीव दुःख, मुख्यमंत्री शिंदेंकडून शोक

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले. पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत व अन्य नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केला आहे.

हीराबेन यांचे संघर्षपूर्ण जीवन स्मरणात राहील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदरणीय आई हिराबेन मोदी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. आई सोबत नसण्यासारखे दु:ख या जगात दुसरे कोणतेही नाही. अशा दु:खद प्रसंगी आम्ही पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. हीराबेन मोदी यांचे संघर्षपूर्ण आणि तपस्वी जीवन सदैव स्मरणात राहील, अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आहे.

- Advertisement -

त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास संपला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे ऐकून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधानांना मिळो. आम्ही सर्व पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

आई जाण्याचे दु:ख मोठे
आईचे छत्र हरपणे यासारखे अनाथपण नाही. आई जाण्याचे दुःख मोठे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. ईश्वर मातोश्री हीराबेन यांच्या आत्म्यास शांती देवो. मोदी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

अन्य नेत्यांकडून श्रद्धांजली
हीराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तसेच इतर मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा – Heeraben Modi Demise : 100 वर्षांचे खडतर आयुष्य आणि 6 मुलांचा सांभाळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -