नवी दिल्ली : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्माची तुलना ही डेंग्यू, मलेरिया या आजारांशी करत या धर्माला पूर्णतः नष्ट करण्याचे विधान केले. ज्यानंतर देशातील धार्मिक वातावरणासह राजकीय वातावरण तापलेले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. सत्ताधाऱ्यांकडून विशेषतः भाजपच्या नेत्यांनी तर या मुद्द्यावरून INDIA आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केलेले पाहायला मिळत आहे. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत बनवलेल्या रणनीतीनंतर विरोधी पक्षनेते सनातनच्या विरोधात वक्तव्य करत असल्याचा थेट आरोप आता भाजपकडून करण्यात आला आहे. (Defamation of Sanatan Dharma by Opposition, BJP Targets Leaders of INDIA Alliance)
हेही वाचा – पंतप्रधान जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या दिशेने रवाना; भारतात थांबण्यामागे ‘हे’ आहे कारण
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांच्या X या सोशल मीडिया हँडलवरून ट्वीट करत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित करत आहे. तर भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी सनातनला बदनाम करण्यासाठी भारत आघाडी स्थापन करण्यात आल्याचा आरोप केला. सनातनच्या मुद्द्यावर सोनिया गांधी, लालू यादव आणि अखिलेश यादव यांच्या हे शांत का आहेत? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. याबाबतचे ट्वीट करत जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे की, “मुंबईत INDIA आघाडीची बैठक झाल्यानंतर त्याच्या दोन दिवसांतच उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनबाबत वक्तव्य केले. त्यानंतर प्रियांक खर्गे यांनी सनातनवर साधलेला निशाणा आणि आज डीमकेच्या मंत्र्यांकडून सांगण्यात येणे की, INDIA आघाडीची निर्मितीच सनातन धर्माच्या विरोधात करण्यात आला आहे, हे सर्व काही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसकडून विचार करून बनविण्यात आलेली रणनिती आहे,”
त्याशिवाय जे. पी. नड्डा यांनी आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले आहे की, या विधानांवरून काँग्रेसकडून मत व्यक्त करण्यात आले पाहिजे. त्यांनी सांगितले पाहिजे की, संविधानामध्ये कोणत्याही धर्माविषयी आक्षेपार्ह विधान करण्याचा घटनेत अधिकार आहे का? I.N.D.I.A च्या लोकांना संविधानातील तरतुदी माहित नाहीत का? I.N.D.I.A आघाडी, काँग्रेस, सोनिया आणि राहुल यांनी सांगावे प्रेमाच्या दुकानाच्या नावाखाली सनातन धर्माच्या विरोधात द्वेषाचा माल का विकला जात आहे? द्वेषाचा हा मेगा मॉल फक्त सत्तेसाठी आहे – फूट पाडा आणि राज्य करा, यासाठी आहे, असा टोला नड्डा यांनी त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून लगावला आहे.
I.N.D.I Alliance की मुम्बई बैठक के दो दिन बाद उदयनिधि स्टालिन का बयान आना, फिर प्रियांक खड़गे का सनातन पर आघात और आज DMK के मंत्री द्वारा ये स्वीकार करना कि I.N.D.I Alliance का गठन ही सनातन धर्म के विरोध में किया गया था, यह सोनिया गांधी, राहुल और कांग्रेस की एक सोची समझी रणनीति…
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) September 12, 2023
तर भाजपचे ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांनी या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधत म्हटले आहे की, सनातन धर्माच्याबाबत अहंकारी आघाडीतील लोक नको ते प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबत आम्ही सोनिया गांधी यांना प्रश्न विचारले होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याही समोर याबाबतचे प्रश्न उपस्थित केले होते. पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. मात्र, तमिळनाडूच्या शिक्षणमंत्र्यांकडून याबाबतचे वक्तव्य करण्यात आले आहे, आणि त्यांनी सांगितले की विरोधकांची आघाडीच सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी झाली आहे.
तसेच, सनातनाला विरोध करणे हा या युतीचा अजेंडा आहे का? आम्ही काँग्रेसला विचारू इच्छितो की, इतर कोणत्याही धर्मावर बोलण्याची त्यांची हिंमत आहे का? हे लोक मतांसाठी सनातनवर बोलत आहेत. पण इतर धर्मांबाबत गप्प आहेत. या मुद्द्यावर सोनिया गांधी गप्प का आहेत? असा प्रश्नही रवीशंकर प्रसाद यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आता भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसला लक्ष्य करण्यात येत आहे. वारंवार सनातन धर्माचा अपमान होत असताना देखील काँग्रेस यांवर का नाही बोलत? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.