घरताज्या घडामोडीचिनी मोबाईल वापरू नका, गुप्तचर यंत्रणांच्या महत्त्वाच्या सूचना; वाचा नेमके प्रकरण काय?

चिनी मोबाईल वापरू नका, गुप्तचर यंत्रणांच्या महत्त्वाच्या सूचना; वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील तणाव कायम आहे. चीनच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. असे असतानाच सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना चीनी फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारत आणि चीन यांच्यात सीमेवरील तणाव कायम आहे. चीनच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. असे असतानाच सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना चीनी फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चीनी फोनमध्ये मालवेअर आणि स्पायवेअर सापडले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी या संदर्भात सूचना दिल्या आहेत. (defence intelligence agencies alarm threat chinese mobile phones troops families use)

राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या सुचनेनंतर सैन्य गुप्तचर यंत्रणांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शत्रूराष्ट्राकडून फोन घेण्यास मनाई केली आहे. तसेच या सूचना यासाठी देण्यात आल्यात की, कारण चीनी फोनमध्ये मालवेअर आणि स्पायवेअर सापडले आहेत. भारतीय बाजार पेठेत विवो, ओप्पो, शाओमी, वन प्लस, ऑनर, रियल मी, जेडटीई, जियोणि, आसुस आणि इनफीनिक्स या सर्व चायनीज कंपन्या आहेत.

- Advertisement -

या पूर्वी देखील सुरक्षा यंत्रणांनी चीनी मोबाइल आणि फोन आणि काही अप्लीकेशन सुरक्षा यंत्रणांनी लष्करी अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून काढून टाकले आहेत. त्यानंतर आता सुरक्षा यंत्रांनी जवानांच्या कुटुंबीयांना देखील चीनी फोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

अरुणाचल प्रदेशचे कॉँग्रेसचे खासदार निनोंग ईरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात चीनी द्वारे निर्मित सीसीटीव्हीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. निनोंग ईरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी घरी लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरे हे चीन निर्मित नसावे किंवा त्यावर प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, याकरीता त्यांनी जनजागृती अभियान देखील सुरू केले आहे. त्यानुसार, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने स्वदेशी निर्मित क्लाऊड स्टोरेज यंत्रणा तयार करावी अशी देखील मागणी केली आहे.


हेही वाचा – पाकिस्तानात होळी खेळण्यापासून हिंदू विद्यार्थ्यांना रोखले; मारहाणीत 15 जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -