घरअर्थजगतपीएफचे पैसे मिळण्यास होतोय विलंब, जाणून घ्या कारण

पीएफचे पैसे मिळण्यास होतोय विलंब, जाणून घ्या कारण

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात पीएफचे पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने लोक चिंताग्रस्त आहे. जाणून घ्या का विलंब होतोय.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान पैशांच्या (रोखीच्या) संकटाशी झगडणार्‍या लोकांना दिलासा देण्यासाठी अलीकडे कित्येक महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. याअंतर्गत विभागाने अशी तरतूद केली आहे की कोविड-१९ मुळे ईपीएफओ ग्राहक त्यांच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेच्या मर्यादेपर्यंत पैसे काढू शकतात. यानंतर पीएफ फंडातील ठेवी काढून घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी अर्ज केला आहे. कोविड-१९ ला कारण बनवून ऑटो मोडमध्ये पीएफ अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करणाऱ्यांचे दावे ईपीएफओ वेगाने निकाली काढत आहेत. तथापि, जर आपण पीएफ पैसे काढण्यासाठी अर्ज केला असेल आणि त्या निकालात बराच वेळ लागत असेल तर मग त्यामागचे कारण काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहात.

आपल्या पीएफ दाव्याच्या सेटलमेंटस विलंब होऊ शकतो किंवा आपला दावा नाकारला जाऊ शकतो, अशी कोणती कारणे आहेत जाणून घेऊया.

- Advertisement -

१. चुकीची माहिती किंवा दस्तऐवजाशी संबंधित विलंब

यूएएनशी कनेक्ट बँक खातं आणि क्लेम केलेल्या खात्याचा डेटा जुळत नसल्यास आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या प्रकरणात, दावा दाखल करताना आपण त्याच खात्यातून चेकची स्कॅन कॉपी अपलोड केली पाहिजे, जी आधीपासूनच यूएएनशी कनेक्ट आहे. तसेच, दावा भरण्यापूर्वी आपला खाते क्रमांक तपासला पाहिजे. खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोडमध्ये काही चूक झाल्यास दावा अपडेट केल्यावर दाखल करावा. स्कॅन कॉपी स्पष्ट नसल्यासही बर्‍याच वेळा क्लेम मिळण्यास विलंब होऊ शकतो.


हेही वाचा – बाजारात आली कोरोना हेअर स्टाईल, पहा फोटो

- Advertisement -

२. आधार आणि ईपीएफ खात्याची माहिती जुळत नाही

जर आपले आधार किंवा ईपीएफ खात्यात नाव, जन्मतारीख, लिंग प्रविष्ट केलेली माहिती जुळत नसेल तर आपल्याला क्लेम मिळण्यात विलंब होऊ शकेल.

३. प्रक्रिया संबंधित विलंब

दाव्यावर प्रक्रिया केल्यानंतर ईपीएफओ सहसा धनादेश बँकेत पाठवते. यानंतर बँका खातेधारकाच्या खात्यावर पाठवतात. तथापि, सर्व कार्यालये सध्या मर्यादित कर्मचार्‍यांसह कार्यरत आहेत आणि दावेही मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत, त्यामुळे प्रक्रियेस विलंब होऊ शकतो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -