Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश प्रदुषित हवेमुळे दिल्लीत हवा शुद्धीकरण यंत्र बसवण्याची वेळ

प्रदुषित हवेमुळे दिल्लीत हवा शुद्धीकरण यंत्र बसवण्याची वेळ

Subscribe

दिल्लीतील प्रदूषित हवा इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे की, आता तिथे हवा शुद्धीकरण यंत्र बसवण्याची वेळ आली आहे.

दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे. System of Air Quality and Weather Forecasting and Research (सफर) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार दिल्लीच्या ‘हवेची गुणवत्ता यादी’ (AQI) ३२९ वर पोहोचल्याचे सांगितले. हा एक्यूआय हवामानाच्या दृष्टीने अतिशय खराब मानला जातो. त्यामुळे आता दिल्लीत हवा शुद्धीकरण यंत्र बसवण्याची वेळ आली आहे. आयटीओ क्रॉसिंगवर हे यंत्र बसवण्यात आले आहे.

वाचा –  दिल्ली की हवा गंदी, एअर प्युरिफायर कंपन्यांची चांदी!

दिल्लीच्या मंदीर नगर परिसरात पार्टिक्युलेट मॅटर १० (पीएम १०) हे ७०७ होते, तर ध्यानचंद स्टेडियम आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात अनुक्रमे ६७६ आणि ६८१ होते. हा पीएमचा स्तर धोकादायक श्रेणीत मोडतो.

- Advertisement -

हिमाचल प्रदेश राज्यातून कामानिमित्त दिल्लीत आलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “आमच्या राज्यापेक्षा दिल्लीतील हवामान खूपच खराब आहे. इथे श्वास घेणे देखील कठीण होत चालले आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरिने काम करतीलच. मात्र नागरिकांनी स्वतःहून हवा आणि निसर्गाची निगा राखली पाहीजे.” भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत सध्या कमाल २९ आणि किमान १५ डिग्री सेल्सियस तापमान आहे.

दिल्ली प्रदूषण: देवपुजेदरम्यान अगरबत्ती, धूप न जाळण्याचा सल्ला
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -