Homeदेश-विदेशAnna Hazare : केजरीवाल स्वार्थी झाले म्हणूनच त्यांच्यापासून अंतर राखले, काय म्हणाले...

Anna Hazare : केजरीवाल स्वार्थी झाले म्हणूनच त्यांच्यापासून अंतर राखले, काय म्हणाले अण्णा हजारे –

Subscribe

जनलोकपाल विधेयकाच्या वेळेस अण्णा हजारे यांना केजरीवाल यांनी साथ दिली होती. आणि तेव्हापासूनच ते दोघे एकत्र होते. मात्र, केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

Delhi Assembly Election 2025 : नवी दिल्ली : दिल्लीतील विधानसभेच्या 70 जागांसाठीच्या मतदानास बुधवारी सकाळी सुरुवात झाली आहे. आप पुन्हा एकदा सत्तेत येण्याची स्वप्ने पाहात आहे तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि भाजप यावेळी तरी सत्ता मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. अशातच, आता पुन्हा एकदा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे मार्गदर्शक अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहायला लागल्यापासून अण्णा हजारे सातत्याने केजरीवाल यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. (delhi assembly election 2025 anna hazare reaction on aap chief arvind kejriwal)

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी सकाळपासून मतदानास सुरुवात झाली आहे. दिल्लीतील जवळपास 1.56 कोटी मतदार 699 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. दुपारी 3 वाजेपर्यंत 46.55 टक्के एवढे मतदान झाले आहे. या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान सुरू असतानाच अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवालांवर टीका केली आहे.

हेही वाचा – Nanded : उपचारासाठी लोकांनी तुमच्या निधीची वाट पहायची का? नांदेड मृत्यूतांडव प्रकरणी न्यायालयाचा सवाल

एका वृत्तसंस्थेशी बोलताना अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना बोल लावले आहेत. जनलोकपाल विधेयकाच्या वेळेस अण्णा हजारे यांना केजरीवाल यांनी साथ दिली होती. आणि तेव्हापासूनच ते दोघे एकत्र होते. मात्र, केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांची नीयत स्वच्छ होती. ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होते, म्हणूनच तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. पण, नंतर ते वेगळ्या वाटेवर चालू लागले. या आंदोलनात अरविंद केजरीवाल आले तेव्हा ते सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोनातून विचार करत होते. यामुळेच, ते उत्तम कार्यकर्ता आहेत, असे मला वाटले होते. मात्र, केजरीवाल स्वार्थी आहेत, असं जेव्हा मला वाटलं तेव्हा मात्र मी त्यांना दूर केले, असे अण्णा हजारे म्हणाले. सुरुवातीला राजकारणात प्रवेश करण्याचा त्यांचा विचार नव्हता पण आता मात्र, ते थेट दारू परवान्याबाबत बोलत असल्याचे हजारे म्हणतात.

ज्या मद्याच्या मुद्द्यावरून आम्ही आंदोलन केले होते, त्याबद्दलच केजरीवाल बोलत आहेत. सुरुवातीला अत्यंत चांगल्या मार्गावरून जाणारे केजरीवाल हे आता चुकीच्या मार्गावर असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. यामुळेच माझे मतदारांना आवाहन आहे की, कोणाकडूनही पैसे घेऊ नका आणि त्याला मतदान करू नका. आणि विचार करूनच आपल्या अधिकाराचा वापर रका, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले. यापूर्वी देखील त्यांनी मतदारांना अशाप्रकारचे आवाहन केले होते.

हेही वाचा – Mallikarjun Kharge : तुझ्या वडिलांचा मी सहकारी, चूप बस खाली; संसदेत मल्लिकार्जुन खर्गेंचा संताप कोणावर?