Delhi Assembly Election 2025 दिल्ली : दिल्लीतल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामे प्रकाशित करत पक्षश्रेष्टींनी मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. एकिकडे आम आदमी पार्टी दिल्लीत पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे तर, दुसरीकडे काँग्रेससह भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा सादर केल्यानंतर आता भाजपकडून जाहीरनामा सादर करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यातून दिल्लीतील नागरिकांनी भाजपकडून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (delhi assembly election 2025 BJP Manifesto oppose arvind kejriwal aap)
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 ही अवघ्या एका महिन्यावर आली आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काऊंटर करण्यासाठी भाजपने नव्या घोषणा केल्या आहेत.
भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा
- महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला दरमहा ₹ 2,500 दिले जातील.
- गरीब भगिनींना सिलिंडरवर ₹ 500 ची सबसिडी दिली जाईल आणि होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक सिलिंडर मोफत दिला जाईल.
- मातृ सुरक्षा वंदना अधिक बळकट करण्यासाठी 6 पोषण किट दिले जातील आणि प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये दिले जातील.
दरम्यान, भाजपच्या हा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यानुसार, “महिला समृद्धी योजनेअंतर्गत दिल्लीतील प्रत्येक महिलेला 2500 रुपये दिले जाणार आहेत. पहिल्या कॅबिनेट बैठकीत समृद्धी योजनेचा निर्णय घेतला जाणार असून, दिल्लीतील महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने केला आहे. तसेच, दिल्लीत ज्या गरिब महिला आहेत त्यांना एलपीजीमध्ये 500 रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. रंगपंचमी आणि दिवळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिला जाणार आहे. शिवाय, मातृ सुरक्षा वंदना योजनेला आणखी ताकद दिली जाणार असून, त्यासाठी 6 कीट दिले जाणार आहेत. प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये देखील दिले जातील”, असे जेपी नड्डा म्हणाले.
हेही वाचा – Ajit Pawar : अजितदादांची दिल्लीत वेगळी चूल; विधानसभेसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर, 13 मुस्लिम