Homeदेश-विदेशVoting Percentage : ती 76 लाख मते आली कुठून; मुख्य निवडणूक आयुक्तांनी...

Voting Percentage : ती 76 लाख मते आली कुठून; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली सविस्तर माहिती

Subscribe

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मंगळवारी केली. त्यापूर्वी त्यांनी ईव्हीएम, मतदानाची आकडेवारी अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम तसेच मतदानाच्या आकडेवारीवरून खूप मोठा गोंधळ झाला होता.

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा मंगळवारी केली. त्यापूर्वी त्यांनी ईव्हीएम, मतदानाची आकडेवारी अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम तसेच मतदानाच्या आकडेवारीवरून खूप मोठा गोंधळ झाला होता. (delhi assembly election 2025 election commission date announcement cec rajiv kumar how 11 pm voting percent data changes)

रात्री 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी एकदम कशी वाढते याचेही स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा रातोरात जवळपास 76 लाख मते वाढण्यावर कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी टीका केली होती. त्यावरही राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे.

हेही वाचा – Rajiv Kumar on Musk : आधी टीका करतात आणि मग कौतुकांचे पूल बांधतात…निवडणूक आयुक्तांची टीका

मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते. पण, अनेक ठिकाणी तसेच अनेक मतदान केंद्रांवर शेवटच्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असते. त्यानंतर हे ईव्हीएम स्ट्रॉंग रूमपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवले जातात. अशावेळी ही सगळी कामे करायची की आधी मतदानाची आकडेवारी द्यायची, अशी विचारणा राजीव कुमार यांनी केली. सगळी कामे केल्यानंतर मग मतदानाची आकडेवारी दिली जाते, जी स्वाभाविकरित्या संध्याकाळी 6 नंतरची असते. परिणामी, ती जास्त असते.

ईव्हीएम हॅक होते या चर्चांमध्ये काहीही दम नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ईव्हीएम ही फुलप्रूफ यंत्रणा आहे. यात व्हायरस येऊ शकत नाही. निवडणुकांत पारदर्शकता यावी, यालाच आमचे प्राधान्य आहे. सर्वोच्च न्यायालय देखील सांगते की, ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. तरीही देखील वारंवार ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली जाते, याला त्यांनी आक्षेप घेतला आहे.

यासोबतच मतदार यादीमध्ये नावे जोडणे आणि त्यातून नावे काढण्याबाबत निवडणूक आयोगावर होत असलेल्या आरोपांना देखील मुख्य निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिले. या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही. देशभरात निष्पक्ष निवडणुका घेण्याला निवडणूक आयोगाचे प्राधान्य आहे. 2020 ते 2024 दरम्यान 21 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि यातील 15 राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकारे सत्तेत आली. हे निवडणुका निष्पक्ष वातावरणात घेतल्या जात असल्याचे निदर्शक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Asaram Bapu : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, सशर्त जामीन मंजूर