Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशDelhi Assembly Election : महाराष्ट्रानंतर दिल्लीची बारी, विधानसभा निवडणुकीसाठी आपची पहिली यादी...

Delhi Assembly Election : महाराष्ट्रानंतर दिल्लीची बारी, विधानसभा निवडणुकीसाठी आपची पहिली यादी जाहीर

Subscribe

दिल्लीतील सर्व 70 विधानसभा मतदारसंघात फेब्रुवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. पण निवडणुकीच्या तीन महिने आधीच आपने 11 उमेदवारांची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यानंतर आता शनिवारी, 23 नोव्हेंबरला निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे, ज्यानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता लगेचच दिल्ली विधानसभा निवडणुकीचेही वारे वाहू लागले आहेत. कारण दिल्लीतील निवडणुकांसाठी आपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीत निवडणुकीला तीन महिने बाकी आहेत. मात्र, तरी सुद्धा आपने आयारामांना पक्षात प्रवेश देत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. (Delhi Assembly Election AAP announced the first list of candidates)

दिल्लीत विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार? याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु, साधारणतः तीन महिन्यांनंतर दिल्लीत निवडणुकांचे बिगूल वाजू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण त्याआधीच आम आदमी पक्षाकडून 11 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. यामध्ये काँग्रेस आणि भाजपातून आलेल्या सहा जणांना तिकीट देण्यात आले आहे. तर उर्वरित आपचेच विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आपने आपल्या पहिल्या यादीत आयारामांना पुढे केल्याचे पाहायला मिळत आहे. आपने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीनुसार, छतरपूर विधानसभेतून ब्रह्मसिंह तंवर यांना उमेदवारी देण्यात आली असून ते भाजपामधून आपमध्ये आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Pune News : पुण्यात शरद पवारांच्या ‘NCP’च्या उमेदवारांचे आमदार म्हणून झळकले बॅनर्स, कार्यकर्त्यांसोबत डान्सही; पण 2019 मध्ये…

तसेच, भाजपामधून आपमध्ये आलेले अनिल झा यांना किरारी विधानसभेतून, बीबी त्यागी यांना लक्ष्मी नगर विधानसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय, काँग्रेसमधून आपमध्ये आलेले झुबेर चौधरी यांना सीलमपूर विधानसभेतून, वीरसिंह धिंगण यांना सीमापुरी विधानसभेतून आणि सोमेन शौकीन यांना मटियाला विधानसभा मतदारसंघातून आपने उमेदवारी जाबीर केली आहे. तर, दिल्लीतील सर्व 70 विधानसभा मतदारसंघात फेब्रुवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी कधीही निवडणुका होऊ शकतात.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -