घरताज्या घडामोडीशाहीनबाग आंदोलनाचा भाजपला तोटा? ओखला मतदारसंघात आप-भाजपमध्ये काँटे की टक्कर

शाहीनबाग आंदोलनाचा भाजपला तोटा? ओखला मतदारसंघात आप-भाजपमध्ये काँटे की टक्कर

Subscribe

मागच्या ५७ दिवसांपासून दिल्लीमधील शाहीनबाग येथे मुस्लिम समुदायातर्फे रस्ता अडवून आंदोलन सुरु आहे. भाजपने शाहीनबागचे राजकारण पुर्ण देशात नेले होते. त्याप्रमाणे शाहीनबाग ज्या मतदारसंघात येते, त्या ओखला विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ब्रहम सिंह आणि आपचे विद्यमान आमदार अमानुतुल्लाह खान यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाल्यापासून आता ११ मतमोजणीच्या फेऱ्या झाल्या आहेत. अकराव्या फेरीनंतर आपचे अमानुतुल्लाह आघाडीवर गेले आहेत तर भाजपचे उमेदवार आता पिछाडीवर पडले आहेत. सकाळपासून भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण होते.

- Advertisement -

ओखला विधानसभा मतदारसंघाची रचना १९७७ मध्ये करण्यात आली होती. या मतदारसंघावर पुर्वीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व होते, मात्र २०१५ साली आपचे अमानुतुल्लाह खान यांनी विजय मिळवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -