दिल्लीच्या गाझीपूर फूल मार्केटमध्ये बेवारस बॅगेत IED स्फोटकं सापडली; पोलीस, सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ

अतिरिक्त डीसीपी म्हणाले की, तज्ज्ञ बॅगमध्ये नेमके काय आहे याची तपासणी करत आहेत. पूर्ण ऑपरेशन संपल्यानंतर पुढील अपडेट शेअर केले जातील.

delhi bomb found in a suspicious bag in ghazipur flower market delhi
दिल्लीच्या गाझीपूर फूल मार्केटमध्ये बेवारस बॅगेत IED स्फोटकं सापडली; पोलीस, सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ

राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे, दिल्लीच्या गाझीपूर फूल मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी आयईडी स्फोटकांनी भरलेली एक बेवारस बॅगेत सापडली आहे. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत IED बॅग सापडलेला परिसर रिकामा केला आहे.

दिल्ली पोलीस विभागाचे राकेश अस्थाना सांगितले की, मिळालेल्या माहितीच्या आधारे आयईडी असलेली बेवारस बॅग जप्त केली आहे. तर बॉम्ब निकामी पथक गाझीपूर फुल मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळ पोहचल्या आहेत. शिवाय स्पेशल सेल अधिकारी, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) या विशेष दहशतवादी विरोधी दल, श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान बॉम्ब निकामी पथकाकडून परिसराची तपासणी सुरु आहे.

देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच हाय अलर्टवर असलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी करत बाजारपेठ रिकामी केली आहे. ही बॅग नेमकी कुठून आली कोणी ठेवली याचा तपास सध्या सुरु आहे.

अतिरिक्त पोलिस उपायुक्त (पूर्व) विनीत कुमार यांनी सांगितले की, सकाळी 10.30 च्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला गाझीपूर फूल मार्केटच्या गेटवर एक बेवारस बॅग पडून असल्याचा फोन आला. यावेळी स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयास्पद बॅग सापडलेल्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी केली. पोलिसांनी इतर यंत्रणांनाही याबाबत सतर्क केले. यानंतर एनएसजीचे बॉम्बशोधक पथक, स्निफर डॉग आणि बॉम्ब तज्ञही घटनास्थळी पोहोचले.

अतिरिक्त डीसीपी म्हणाले की, तज्ज्ञ बॅगमध्ये नेमके काय आहे याची तपासणी करत आहेत. पूर्ण ऑपरेशन संपल्यानंतर पुढील अपडेट शेअर केले जातील.

आजपासून 12 दिवसांनी देशात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामुळे राजधानी दिल्ली हाय अलर्टवर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय सण कोणताही अनुचित प्रकार न घडता साजरा व्हावा यासाठी केंद्रीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांसह दिल्ली पोलीस देशविरोधी घटकांवर आणि त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवून आहेत.


सेक्स वर्करला नाही म्हणण्याचा अधिकार मग पत्नीला का नाही? उच्च न्यायालयाचा गंभीर सवाल