घरताज्या घडामोडीदिल्ली हिंसाचार: परिस्थिती हाताबाहेर जातेय, कर्फ्यू लावा - अरविंद केजरीवाल

दिल्ली हिंसाचार: परिस्थिती हाताबाहेर जातेय, कर्फ्यू लावा – अरविंद केजरीवाल

Subscribe

दिल्लीत सीएएवरून सलग तिसर्‍या दिवशी हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार थांबवण्याची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन अजित डोवाल यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सीलपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्याच्या यांच्या कार्यालयात यानंतर बैठक घेतली. सध्या अजित डोवाल यांचे दिल्लीतील परिस्थितीवर अत्यंत बारीक लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक नेत्यांशी देखील संवाद साधला आहे. देशातील राजधानीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ देणार नाही. तसंच पुरेसे पोलिस आणि निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. हल्लेखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना कारवाई करण्याची परवानगी दिली असल्याचं, एनएसए ने स्पष्ट केलं आहे.

लोकांनी वर्दीवर विश्वास ठेवला पाहिजे

दिल्लीच्या हिंसाचारा संबंधित एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित डोवाल म्हणाले की, ‘मी आश्वासन देतो की, कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. पुरेसे सैन्य तैनात करण्यात आली आहे. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. लोकांनी वर्दीवर विश्वास ठेवला पाहिजे.’

- Advertisement -

कर्फ्यू लावण्याची मागणी – केजरीवाल 

तसंच या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत कर्फ्यू लावण्याची मागणी केली आहे. त्यांनी असं ट्विट केलं आहे की, मी रात्री पासून लोकांसोबत संपर्क करत आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक आहे. पोलिसांनी इतके प्रयत्न करू सुद्धा परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सैनिकांना तैनात करणे गरजेचं आहे. तसंच काही भागात कर्फ्यू लावला पाहिजे. मी यासंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे.

- Advertisement -


हेही वाचा – दिल्लीतील हिंसाचारातील मृतांचा आकडा पोहचला २० वर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -