धक्कादायक! महिलेच्या शरिरातून डॉक्टरांनी काढले ५० किलोचे ट्यूमर!!

तुम्ही अशा बर्‍याच रूग्णांविषयी ऐकले असेलच डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातून ट्यूमर काढून टाकले असेल. मात्र एखाद्या व्यक्तीच्या शरीरात ५० किलो ट्यूमर सापडला आहे असे आपण कधी ऐकले आहे का? नाही, परंतु हे सत्य आहे. दिल्लीत डॉक्टरांनी एका महिलेच्या शरीरातून ५० किलोची ट्यूमर काढून टाकला आहे. या प्रकारामुळे डॉक्टर देखील हैरान झाले आहेत.दिल्ली येथील ५२ वर्षीय महिलेचे वजन गेल्या काही महिन्यांपासून वाढत होते आणि तिचे वजन १०६ किलोपर्यंत पोहोचले होते. ऑपरेशन करून डॉक्टरांनी तिच्या शरीरातून तब्बल ५० किलोचा ट्यूमर काढून टाकला आहे, त्यानंतर सर्व डॉक्टर्स चकित झाले होते. हा जगातील सर्वात मोठा ट्यूमर असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

अपोलो हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार (सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि बॅरिएट्रिक सर्जरी) डॉ. अरुण प्रसाद यांनी सांगितले की त्या महिलेला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला, खालच्या ओटीपोटात तीव्र वेदना होत होता. तसेच तिला चालण्यास आणि झोपण्यास देखील समस्या जाणवत होती. “तपासणीनंतर असे आढळले की महिलेच्या अंडाशयात एक मोठा ट्यूमर होता आणि यामुळे तिच्या आतड्यावर दबाव येत होता, ज्यामुळे महिलेला ओटीपोटात वेदना होत होती आणि अन्न पचन करण्यात तिला अडचण झाली होती. महिलेच्या हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याने तिला अशक्तपणा देखील जाणवू लागला होता, असे डॉक्टरांंनी सांगितले.

१८ ऑगस्ट रोजी साडेतीन तासाच्या शस्त्रक्रियेमध्ये शल्यचिकित्सकांच्या पथकाने त्या महिलेच्या अंडाशयातून ५० किलो ट्यूमर काढून टाकला. यासंदर्भात डॉ. प्रसाद म्हणाले, “सर्जन म्हणून ३० वर्षांच्या अनुभवात मी ट्यूमरचे वजन त्या व्यक्तीच्या शरीराच्या अर्ध्या वजनाच्या जवळपास असल्याचे कधीच पाहिले नव्हते. यापूर्वी २०१७ मध्ये सर्वात मोठा ट्यूमर कोयंबतूरमध्ये महिलेच्या शरीरातून काढला होता. त्याचे वजन तब्बल ३४ किलो असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “डॉक्टरांच्या पथकाला हे ५० किलोचे ट्यूमर शरीराबाहेर काढणं आव्हान होतेच तसेच ते अवघड होते कारण रुग्णाच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता देखील होती. ऑपरेशनपूर्वी आणि नंतर त्या महिलेला सहा युनिट रक्त दिण्यात आले होते.


अजून दोन वर्ष तरी कोरोना काही जात नाही – WHO