Video: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं खळबळजनक वक्तव्य

delhi ceo seeks report over controversial statement of central minister anurag thakur
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं खळबळजनक वक्तव्य

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे. ज्यावर दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी रिपोर्ट मागविला आहे. रिठाला येथील भाजपचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनुराग ठाकूर यांनी निवडणुकीच्या सभेत आलेल्या लोकांना ‘गद्दारो को गोली मारो’ अशा प्रतिघोषणा दिल्या. या घोषणेनंतर सोशल मीडियावर गद्दार हा हॅशटॅगचा ट्रेंड सुरू झाला आहे. तसंच सभेतीला हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणाबाजी करताना लोक देखील साथ देताना दिसत आहेत. लोकांकडून वादग्रस्त घोषणाबाजी केल्यामुळे अनुराग ठाकूर यांच्या टीकेची झोड उठली आहे. ज्येष्ठ वकील आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते प्रशांत भूषण यांनी असं म्हटलं की, ‘अशा व्यक्तीने मंत्रीमंडळात नसावे तर तरुंगात असावे’, असा टोला त्यांनी लगावला आहे. तर काँग्रेसकडून अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

भाजपवर टीका करताना दिल्ली काँग्रेसचे प्रचार समितीचे प्रमुख किर्ती आझाद म्हणाले की, ‘भगवा पक्षाचे नेते खरे गद्दार असतात. जे शांतता बिघडविण्याचे काम करतात. अशा प्रकारेच्या घोषणा कपिल मिश्रा यांच्यासारखे भाजपचे नेते करत असतात, परंतु पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीने यात भाग घेतला आहे.’

विशेष म्हणजे भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांना निवडणूक प्रचारातून वगळण्यात आले आहे. कपिल मिश्रा यांनी असं ट्विट केलं होत की, ‘८ फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.’ यामुळे निवडणूक आयोगाने कपिल मिश्रा यांना ४८ तासांसाठी प्रचार करण्यास मनाई केली होती. दिल्लीची विधानसभा निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.


हेही वाचा – सुबोध जयस्वाल दिल्लीचे पोलीस आयुक्त होणार?