घरताज्या घडामोडीअरविंद केजरीवाल एकदिवसाच्या गुजरात दौऱ्यावर, भाजपाकडून 'मोदी-मोदी' घोषणा

अरविंद केजरीवाल एकदिवसाच्या गुजरात दौऱ्यावर, भाजपाकडून ‘मोदी-मोदी’ घोषणा

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी 'मोदी-मोदी' अशा घोषणा दिल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमधील वडोदरा विमानतळावर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दाखल झाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमधील वडोदरा विमानतळावर आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दाखल झाले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या भाजपाच्या कार्यतर्त्यांनी पतप्रधान नरेंद्री मोदी यांच्या नावाने “मोदी-मोदी” अशा घोषणा दिल्या. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल हे एकदिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील वडोदरा येथील टाऊन हॉलमधील सभेला उपस्थित राहून ‘आप’च्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. (Delhi CM and AAP national convener Arvind Kejriwal greeted with Modi Modi chants in Vadodara)

भाजपाचे कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्यासमोर घोषणा देत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरविंद केजरीवाल विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणाबाजी करताना दिसत आहेत. याबाबत भाजपाचे प्रिती गांधी यांनी ट्विट केले आहे. तसेच, यामध्ये “मोदींच्या गुजरातमध्ये अरविंद केजरीवाल यांचे हार्दिक स्वागत होत आहे”, असे लिहिले आहे.

- Advertisement -

गुजरातमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आप पक्ष सत्तेवर आल्यास पंजाबप्रमाणे येथील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार असल्याचे आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिले. याशिवाय, ‘पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आप शासित पंजाबमध्ये जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याबाबत विचार करण्याचे आदेश जारी केले आहेत’, असेही केजरीवाल यांनी म्हटले.

“गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. मी त्यांना हमी देतो की आम आदमी पार्टीचे सरकार आल्यावर आम्ही गुजरातमध्ये ओपीएस लागू करू. विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून केजरीवाल एका सभेला संबोधित करण्यासाठी वडोदरात आहेत” असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

- Advertisement -

“सरकार निवडण्यात किंवा काढून टाकण्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी भूमिका असते”, असेही केजरीवाल यांनी म्हटले.


हेही वाचा – दसऱ्याला आम्ही ‘शिवतीर्थ’वर जमणारच; शिवाजी पार्ककरीता शिवसेना ठाम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -