घरदेश-विदेशDelhi CM : अरविंद केजरीवालांच्या घरी क्राईम ब्रँचची टीम, आमदार खरेदी-विक्रीचा आरोप

Delhi CM : अरविंद केजरीवालांच्या घरी क्राईम ब्रँचची टीम, आमदार खरेदी-विक्रीचा आरोप

Subscribe

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी दिल्ली पोलिस क्राईम ब्रँच टीम पोहचली आहे. शुक्रवारी संध्याकाळी क्राईम ब्रँचचे एसीपी यांच्या नेतृत्वात ही टीम त्यांच्या घरी पोहचली आहे. आम आदमी पार्टीच्या विरोधकांना पैशांचे आमिष दिले जात आहे, आमदारांची खरेदी-विक्री होत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. या प्रकरणी केजरीवालांना नोटीस देण्यासाठी पोलिस आले आहेत.

केजरीवाल यांचा आरोप आहे की, त्यांच्या 21 आमदारांना फोडण्याची योजना आखली जात आहे. त्यांच्या सात आमदारांसोबत आतापर्यंत संपर्क करण्यात आला आहे.

- Advertisement -

दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता की भारतीय जनता पक्ष आपच्या आमदारांना 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे. त्यांच्या सात आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. या संबंधीची व्हिडिओ क्लिप देखली उपलब्ध असल्याचा दावा आतिशी यांनी केला होता. योग्य वेळी व्हिडिओ समोर आणला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा आरोप आहेच. आताच बिहारमध्येही भाजपने नितीशकुमार यांना इंडिया आघाडीतून फोडल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांना 50-50 कोटी वाटल्याचा आरोप तेव्हा झाला. त्यासाठी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणाही प्रचलित झाली आहे. महाराष्ट्र आणि बिहार नंतर आता भाजपने दिल्लीतील आपचे आमदार फोडून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु केल्याचा आरोप इंडिया आघाडीकडून होत आहे.

- Advertisement -

आपचे उपमुख्यमंत्री, मंत्री, खासादार तुरुंगात 

अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री तुरुंगात आहेत. त्यातील एक उपमुख्यमंत्री आहेत. केजरीवालांचे मित्र आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी अटक झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून साधारण वर्षभरापासून ते तुरुंगात आहेत. सिसोदियांनीही दावा केला होता, की त्यांना भाजपमध्ये सामील व्हा अशी ऑफर होती. मात्र त्यांनी नकार दिला आणि त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, असे मुख्यमंत्री केजरीवालांनी म्हटले होते. आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांना देखील अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : Parliament Budget Session: खर्गे म्हणाले, अब की बार 400 पार…; अन् सभागृहात पिकला हशा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -