घरदेश-विदेशArvind Kejriwal on Kashmiri Pandit : 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांसोबत जे...

Arvind Kejriwal on Kashmiri Pandit : 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांसोबत जे घडलं तेच आजही घडतंय; अरविंद केजरीवालांचा दावा

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याकांवर झालेल्या दहशतवादी (Kashmiri Pandit) हल्ल्यांचा निषेध केला आहे. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काश्मिरी पंडितांच्या हत्येविषयी दु:ख व्यक्त करत म्हटले की, काश्मिरी पंडित खूप दु:खी आहेत, त्यांची , त्यांना दहशतवाद्यांपासून संरक्षण द्यावे अशी त्यांची एकच मागणी आहे. ते पुन्हा जाऊन काश्मीरमध्ये स्थायिक झाले पण 90 च्या दशकात काश्मिरी पंडितसोबत जे घडलं तेच पुन्हा आजही घडतयं. एका, एका काश्मिरी पंडिताला शोधून मारले जात आहेत. (Delhi Government Kashmiri Pandit)

केजरीवाल पुढे म्हणाले की, जेव्हा ते आंदोलनासाठी पुढे येतात तेव्हा त्यांना त्यांच्या वसाहतीमध्ये कोंडून ठेवले जाते. हा कसला न्याय आहे. राहुल भट्ट असोत वा रजनी बाला, 16 काश्मिरी पंडितांना शोधून मारण्यात आले. दहशतवाद्यांना काश्मिरी पंडितांनी एकत्र राहावे असे वाटत नाही, मात्र काश्मीर हीच काश्मिरी पंडितांची जन्मभूमी आहे, आपले घरं हे आपलेच घर असते. त्याच्यासोबत एक वेगळे नाते असते. (Arvind Kejriwal on Kashmiri Pandit)

- Advertisement -

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, “आता काश्मिरी पंडित जम्मू, श्रीनगर किंवा इतर जागी स्थलांतरित होण्यासाठी ट्रकवाल्यांशी वाटाघाटी करत आहेत. काश्मिरी पंडितांसोबत हे दुसऱ्यांदा घडत आहे. काश्मिरी पंडितांना तिथे सुरक्षितपणे स्थायिक करावे, अशी आमची केंद्र सरकारला विनंती आहे, यात आमची जी भूमिका असेल ती आम्ही बजावू. (Kashmiri Pandits killed in Kashmir)


त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीकाश्मीरमधील एका हिंदू शिक्षकाच्या हत्येच्या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. काश्मिरी पंडित धरणे आंदोलन करत आहेत, पण सरकार सत्तेत येऊन आठ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात व्यस्त आहे, असा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, काश्मीरमध्ये गेल्या 5 महिन्यांत 15 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आणि 18 नागरिक मारले गेले. कालही एका शिक्षकाचा मृत्यू झाला.” मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधींनी पुढे म्हटले की, “काश्मिरी पंडित 18 दिवसांपासून धरणे आंदोलन करतायत, पण भाजप त्यांच्या सत्तेची 8 वर्षे साजरी करण्यात व्यस्त आहे. पंतप्रधान हा चित्रपट नसून काश्मीरचे आजचे वास्तव आहे.”

मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात हिंदू शिक्षिका रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शिक्षकाच्या हत्येनंतर पंतप्रधान पॅकेज अंतर्गत तैनात काश्मिरी पंडित समुदायाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, येत्या 24 तासांत त्यांना सुरक्षित ठिकाणी न पाठवल्यास त्यांना मोठ्या प्रमाणावर खोऱ्यातून पळून जावे लागेल.


सौरव गांगुली यांचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा?, ट्टिटरद्वारे नव्या कारकिर्दीचे संकेत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -