घरदेश-विदेशArvind Kejriwal : तिहार तुरुंगात जाण्यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केली विशेष मागणी

Arvind Kejriwal : तिहार तुरुंगात जाण्यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केली विशेष मागणी

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. परंतु, तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवाल यांच्याकडून काही गोष्टींची मागणी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवाल यांना अटक केली आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार केजरीवाल असल्याचा ईडीचा दावा आहे. अटकेनंतर सुरुवातीला केजरीवाल यांना सात दिवस ईडी रिमांड सुनावली होती. त्यानंतर 28 मार्च रोजी केजरीवाल यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पुन्हा केजरीवालांत्या ईडी कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांना पुन्हा 15 दिवसांची कोठडी सुनावली. आता या सुनावणीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. परंतु, तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवाल यांच्याकडून काही गोष्टींची मागणी करण्यात आली आहे. (Delhi CM Arvind Kejriwal made a special demand before going to Tihar Jail)

हेही वाचा… Arvind Kejriwal : मोदी जे करतायत ते चांगलं नाही…न्यायालयात जाण्यापूर्वी केजरीवाल काय म्हणाले

- Advertisement -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात नेमक्या बराकीत ठेवण्यात येणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पण केजरीवाल यांनी तुरुंगात जाण्याआधी त्यांच्याजवळ भगवद्गीता, रामायण हे दोन ग्रंथ ठेवण्याची परवानगी मागितली आहे. तसेच ‘हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड्स’ हे पुस्तकदेखील त्यांना त्यांच्याजवळ हवे आहे. केजरीवाल तुरुंगात 15 दिवसांमध्ये हे दोन ग्रंथ आणि पंतप्रधानांबाबतचे पुस्तक वाचतील. यासह त्यांनी तुरुंगात धार्मिक लॉकेट परिधान करण्याची परवानगी मागितली आहे. केजरीवालांनी त्यांची नियमित औषधे आणि विशेष डाएटचीदेखील मागणी केली आहे.

केजरीवाल यांच्या कोठडीची मुदत 1 एप्रिल रोजी संपली. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांना दिल्ली राऊज एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी मीडियाने त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात येण्यापूर्वी मीडियाशी बोलताना केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यावेळी केजरीवाल एकच वाक्य बोलले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करत आहेत, ते देशासाठी चांगले नाही.’

- Advertisement -

केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी ईडीने केली होती. एएसजी एस.व्ही. राजू यांनी ईडीची बाजू मांडली. केजरीवाल तपासात सहकार्य करत नाहीत आणि सतत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सांगत ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. केजरीवाल यांना तूर्त न्यायालयीन कोठडी सुनावण्यास हरकत नाही, मात्र नंतर ईडीला त्यांच्या आणखी कोठडीची आवश्यकता लागू शकते, असे राजू यांनी खंडपीठासमोर सांगतिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -