गुजरातमध्ये आपचे सरकार बनवा, १ मार्चपासून मोफत वीज मिळेल – अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal

अहमदाबाद – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर आहेत. अहमदाबादमध्ये रिक्षाचालकांशी संवाद साधताना ऑटो रिक्षावाल्याने अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले आणि तुम्ही पंजाबमध्ये एका ऑटोचालकाच्या सांगण्यावरून जेवायला गेला होता, असे सांगितले. हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर पाहिला. माझ्यासोबत जेवायला याल का? असा प्रश्न त्याने विचारला. यावर केजरीवाल यांनी म्हणाले होय, आज संध्याकाळी येतो, असे उत्तर दिले.

विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की, गुजरातमध्ये ‘आप’चे सरकार बनले तर, चांगले आणि मोफत उपचार देऊ.  यांच्या घरात कोणी आजारी पडले तर लंडन अमेरिकेत जाऊन उपचार घेतात आणि आम्ही सरकारी दवाखान्यात मोफत उपचार केले तर फुकट रेवडीचा आरोप करतात. महागाईने सर्वजण हैराण झाले आहेत, उपचार मोफत झाले, वीज फुकट झाली तर दिलासा मिळेल का? दिल्ली पंजाबमध्ये वीज मोफत आहे. गुजरातमध्ये सरकार बनवा, तुम्हाला १ मार्चपासून मोफत वीज मिळेल. मोफत विजेमुळे या लोकांना मीर्ची लागते. जनतेला 300 युनिट वीज मोफत घेऊ द्या निर्लज्जानो. 18 वर्षांवरील महिलेला दरमहा 1000 रुपयांची आर्थिक मदत, पण अनेक भाऊ बसलेत बहिणीच्या 1000 रुपयांची दारू पिऊ नका. जर घरात 3 मुली असतील तर दरमहा 3000 रुपये दिले जातील, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.

अहमदाबादमध्ये ऑटो चालकांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजप एक शक्तिशाली पक्ष आहे, त्याने संपूर्ण देशाला घाबरवले आहे. विशेषत: मीडियाच्या लोकांना. आमच्यासोबत जनता आहे, सर्व लोक फोन काढून माझे भाषण रेकॉर्ड करतात आणि व्हॉट्सअॅपवर पाठवतात, 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजपचा मुख्यमंत्री कधी तुमच्याशी समोरासमोर बोलला आहे किंवा ऑटोचालकाच्या घरी जेवण खाल्ले आहे का? दिल्लीत, आमच्या सरकारने कोरोना लॉकडाऊन दरम्यान दीड लाख वाहनधारकांच्या बँक खात्यात दोनदा 5 हजार रुपये पाठवले.

केजरीवाल पुढे म्हणाले की, सरकारी शाळांमध्ये किती लोक मुलांना शिकवतात? सरकारी शाळेत शिक्षण कसे आहे? गुजरातच्या सरकारी शाळेची अवस्था वाईट आहे. बळजबरीने मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकवले जाते. मी चांगले शिक्षण दिले तर ऑटोचालकाची पोरं डॉक्टर इंजिनियर होईल. केजरीवाल यांच्यासाठी ते मोफत रेवडी वाटप करत असल्याचे बोलले जात आहे. सर्वांना मोफत शिक्षण हवे आहे. त्यांची मुले परदेशात शिकतात आणि आमच्या मोफत शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे करतात. त्यांना मतदान करून काही उपयोग नाही, तुमची मुले उद्ध्वस्त होतील, आम्हाला मतदान केले तर तुम्ही आबाद व्हाल असे दिल्लेच मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.