Homeदेश-विदेशDelhi Cm Atishi : भाजप नेत्यानं बाप काढला, दिल्लीच्या मुख्यमंत्री भर पत्रकार...

Delhi Cm Atishi : भाजप नेत्यानं बाप काढला, दिल्लीच्या मुख्यमंत्री भर पत्रकार परिषदेत रडल्या; म्हणाल्या, “माझे वडील…”

Subscribe

Atishi On Ramesh Bidhuri : बिधुरी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत असतानाच मुख्यमंत्री आतिशी यांनीही भाष्य केले आहे.

 दिल्ली : ऐन थंडीच्या दिवसांमध्ये दिल्लीतील वातावरण गरम झालं आहे. त्याला कारण आगामी काही दिवसांत होणारी विधानसभा निवडणूक. दिल्लीत भाजप आणि आम आदमी पक्षात ( आप ) आरोप-प्रत्यारोपांच्या फैर झडत आहेत. भाजपचे नेते, रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर झाले आहे.

रमेश बिधुरी यांना मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात कालकाजीमधून रिंगणात उतरवलं आहे. पण, मुख्यमंत्री आतिशी यांनी बाप बदलला आहे, असं विधान बिधुरी यांनी केले होते. यानंतर बिधुरी यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत असतानाच मुख्यमंत्री आतिशी यांनीही भाष्य केले आहे.

हेही वाचा : “मते दिली म्हणजे मालक नाही झालात,” अजितदादांच्या वक्तव्यावर भुजबळांचा सल्ला; म्हणाले…

आतिशी म्हणाल्या, “रमेश बिधुरी माझ्या 80 वर्षांच्या वडिलांना शिवीगाळ करत आहेत. निवडणुकीसाठी असे घाणेरडे राजकारण करणार का? या देशाचे राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकते, असं मला कधीच वाटले नव्हते.”

“मला रमेश बिधुरी यांना सांगायचे आहे, माझे वडील आयुष्यभर शिक्षक राहिले आहेत. त्यांनी हजारो गरीब मुलांना शिकवले आहे. आता ते 80 वर्षांचे असून त्यांची प्रकृती इतकी गंभीर की, त्यांना आधाराशिवाय चालताही येत नाही. रमेश बिधुरी आता, अशा टप्प्यावर आहेत, की एका एका वृद्धाला शिवीगाळ करून मते मागत आहेत,” असा संताप आतिशी यांनी व्यक्त केला आहे.

रमेश बिधुरी काय म्हणाले होते?

रविवारी एका रॅलीला संबोधित करताना रमेश बिधुरी म्हणालेले की, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आपला बाप बदलला आहे. मार्लेनावरून त्यासिंह बनल्या आहेत. त्यांनी नाव बदललं आहे. हे यांचं चरित्र आहे.

प्रियांका गांधी यांच्याबद्दलही बिधुरींचं वादग्रस्त वक्तव्य…

त्याआधी बिधुरी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांच्याबाबत बोलताना वादग्रस्त विधान केली होती. “लालूंनी बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवण्याचे आश्वासन दिले होते. पण, ते तसे करू शकले नाहीत. कालकाजीतील सर्व रस्ते मी प्रियांका गांधींच्या गालासारखे करून देईन, असं आश्वासन मी देतो.”

हेही वाचा : “जिरवा जिरवीच्या राजकारणानं आपण मागे पडलो,” जयंत पाटलांनी नेत्यांना सुनावलं; म्हणाले, मैदानात उतरताना…