घरदेश-विदेशDelhi CM : केजरीवाल यांना कोर्टाचा दणका! 17 फेब्रुवारीपर्यंत ईडीसमोर हजर राहण्याचे...

Delhi CM : केजरीवाल यांना कोर्टाचा दणका! 17 फेब्रुवारीपर्यंत ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने मोठा दिला आहे. ईडीने वारंवार समन्स बजावल्यानंतर न्यालयाने आता केजरीवाल यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. न्यायालयाने केजरीवाल यांना 17 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. (Delhi CM Arvind Kejriwal hit by court Ordered to appear before ED by February 17)

हेही वाचा – Bihar Politics : फ्लोअर टेस्टआधीच जेडीयूचे 17 आमदार बेपत्ता; तेजस्वी यादव यांच्या पत्नीची पोस्ट चर्चेत

- Advertisement -

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ईडीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करायची आहे. यासाठी ईडीने त्यांना चौकशीसाठी 5 समन्स बजावले, मात्र केजरीवाल काही चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे ईडीने याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने आज आपला निर्णय देताना केजरीवाल यांना येत्या 17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहेत. एसीएमएम दिव्या मल्होत्रा ​​यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान, सांगायचे झाले तर केजरीवाल यांना ई़डीने याआधी 5 वेळा समन्य बजावले आहेत. मात्र मात्र त्यांनी हे समन्स बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत फेटाळले आहेत आणि ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. ईडीने या महिन्यातच 2 फेब्रुवारी रोजी पाचवे समन्स जारी केले होते. मात्र केजरीवाल चौकशीसाठी आले नाहीत. त्यामुळे ईडीने न्यायालयात धाव घेतली आहे.

ईडीने न्यायालयात काय युक्तिवाद केला

न्यायालयात युक्तीवाद करताना ईडीने म्हटले की, केजरीवाल आमच्या समन्सवर मुद्दाम हजर झाले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या तारखांना बजावलेल्या समन्सचे जाणीवपूर्वक पालन केले नाही. केजरीवाल कारणं देत आहेत. त्यांची भूमिका आणि इतरांची भूमिका तपासण्यासाठी, तसेच गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेचा शोध घेण्यासाठी चौकशीसाठी बोलावण्यासाठी समन्स बजावले होते. केजरीवाल हे उच्चपदस्थ सार्वजनिक अधिकारी असल्यामुळे ज्यांनी कायद्याचे पालन करणे अपेक्षित होते. मात्र एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या लोकांनी कायद्याचे उल्लंघन केले तर ते सर्वसामान्यांसाठी चुकीचे उदाहरण ठरेल, असे ईडीने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – NCP : कोणत्या गटाकडे किती संख्याबळ! दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण?

केजरीवाल यांनी काय केले आरोप? 

गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर 2023 आणि 21 डिसेंबर 2023, त्यानंतर यावर्षी 3 जानेवारी, 18 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीला केजरीवाल यांना समन्स पाठवण्यात आले होते. या संदर्भात अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स का पाठवले? दोन वर्षांपासून तपास सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच का बोलावले होते? असे प्रश्न उपस्थित करत म्हटले की, सीबीआयने 8 महिन्यांपूर्वी फोन केला होता. मी पण जाऊन उत्तरे दिली होती. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना बोलावले जात असल्याने माझी चौकशी करणे हा त्यांचा उद्देश नाही. ते लोक मला फोन करून अटक करू इच्छितात. जेणेकरून मी प्रचार करू शकत नाही. नेत्यांना आपल्या पक्षात समाविष्य करून घेण्यासाठी भाजपा ईडी आणि सीबीआयचा वापर करत आहे, असा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -