घरदेश-विदेशदिल्लीच्या सर्व पर्यटनस्थळांची माहिती एका क्लिकवर; मुख्यमंत्री केजरीवालांनी लाँच केलं ॲप

दिल्लीच्या सर्व पर्यटनस्थळांची माहिती एका क्लिकवर; मुख्यमंत्री केजरीवालांनी लाँच केलं ॲप

Subscribe

जर तुम्हाला दिल्लीला भेट द्यायची असेल आणि हॉटेलिंगपासून ते प्रवासापर्यंतचे व्यवस्थापनही पाहायचे असेल तर आता तुमच्यासाठी अधिक सोपे होणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘देखो मेरी दिल्ली’ मोबाईल अॅप लाँच केले. हे अॅप स्वतः पर्यटकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. अॅप लाँच करताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही प्रमुखपणे उपस्थित होते.

देशाची राजधानी दिल्लीत येणाऱ्या पर्यटकांना यापुढे येथील पर्यटन स्थळांच्या माहितीसाठी भटकावे लागणार नाही, कारण दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारने पर्यटकांना मदत करण्यासाठी मोबाईल फोन अॅप विकसित केले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्ली सचिवालयात दिल्ली पर्यटनाचे अॅप लाँच केले.

- Advertisement -

पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्याच्या मते, मोबाईल अॅपमध्ये पर्यटन स्थळांचा संक्षिप्त माहिती देखील उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त, बाजारपेठ, खाण्याची ठिकाणे आणि मैदान इत्यादी लोकप्रिय ठिकाणांची माहिती देखील उपलब्ध होणार आहे. या अॅपबाबत केजरीवाल यांनी ट्विट केले की, ‘आम्ही दिल्लीला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी एक उत्तम अॅप तयार केले आहे, ज्याद्वारे पर्यटक त्यांच्या दिल्ली प्रवासाचे नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतील. या अॅपमध्ये तिकीट बुकिंगपासून मॅप नेव्हिगेशन आणि पर्यटन स्थळांचा व्हर्च्युअल व्हिडीओ टूर अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. तसेच केजरीवाल यांनी असेही सांगितले की, दिल्ली हे देश -विदेशातील पर्यटकांसाठी निवडलेल्या शहरांपैकी एक आहे, त्यामुळे देखो मेरी दिल्ली अॅपची गरज भासली, जे शहराबद्दल संपूर्ण माहिती देऊ शकते.


पर्यटक आपला ब्रँड एम्बेसेडर होईल अशा सुविधा करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सूचना

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -