Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश शशी थरूर यांना तात्पुरता दिलासा

शशी थरूर यांना तात्पुरता दिलासा

सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या पटियाला कोर्टात आज सुनावणी झाली. शशी थरूर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून थरूर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Related Story

- Advertisement -

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेता शशी थरूर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरूवार, ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टात आज सुनावणी होणार होती. मात्र सुनावणी पुढे ढकलल्यामुळे शशी थरूर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून याप्रकरणी लागोपाठ पटियाला कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, कोर्टाने याप्रकरणी दक्षिण दिल्ली पोलिसांना स्पष्टीकरण मागितले होते. तसेच आपले म्हणणे कोर्टासमोर मांडण्यासही सांगितले होते. तर आज याप्रकरणीत शशी थरूर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार होती.

एसआयटी रिपोर्टचा दाखला

- Advertisement -

यापूर्वी सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली शशी थरूर यांना समन्स बजावण्यात आला आहे. थरूर यांचे वकिल विकास पाहवा यांनी त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. यामध्ये त्यांनी नमूद केले की, शशी थरूर यांना अटक करण्यापूर्वीच त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (एसआयटी)ने स्पष्ट केले आहे की, चौकशी पूर्ण झाली असून आता अटकेची आवश्यकता नाही.

थरूरवर यामुळे संशय 

सुनंदा पुष्कर यांचा १७ जानेवारी २०१४ रोजी मृत्यू झाला होता. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. शशी थरूर यांच्यासोबत २०१० साली त्यांचा विवाह झाला होता. या प्रकरणी थरूर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांमध्ये दिल्ली एअरपोर्टवर झालेल्या वादानंतर सुनंदा पुष्कर यांनी स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतले होते. दिल्ली एअरपोर्टवरील भांडणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरच थरूर यांच्यावरील संशय बळावला.

- Advertisement -