घरक्राइमDelhi Crime : अल्पवयीन तरूणीच्या हत्येने दिल्ली हादरली, आरोपीने केले 40 वार

Delhi Crime : अल्पवयीन तरूणीच्या हत्येने दिल्ली हादरली, आरोपीने केले 40 वार

Subscribe

दिल्ली अल्पवयीन तरूणीच्या हत्येमुळे हादरली आहे. दिल्लीत एका 16 वर्षीय मुलीची तिच्या प्रियकराकडून तब्बल 40 वार करून हत्या करण्यात आलेली आहे. रविवारी (ता. 28 मे) रात्री शाहबाद डेअरी परिसरात या घटनेने खळबळ उडाली.

दिल्ली म्हंटल की, आठवते ती निर्भयाची हत्या. निर्भयाच्या हत्येमुळे फक्त दिल्लीचं नाही तर संपूर्ण देश हादरला होता. त्यामुळे दिल्ली महिलांसाठी असुरक्षित आहे, अशी या राज्याची ओळख झाली. आता पुन्हा दिल्ली अल्पवयीन तरूणीच्या हत्येमुळे हादरली आहे. दिल्लीत एका 16 वर्षीय मुलीची तिच्या प्रियकराकडून तब्बल 40 वार करून हत्या करण्यात आलेली आहे. रविवारी (ता. 28 मे) रात्री शाहबाद डेअरी परिसरात या घटनेने खळबळ उडाली. मनाचा थरकाप उडवणारी ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये सुद्धा कैद झाली. पण पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आरोपी तरूणाला बुलंदशहर येथून अटक केली आहे. साहिल असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरूणाचे नाव आहे. तर साक्षी असे मृत तरूणीचे नाव असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

हेही वाचा – हृदयद्रावक! मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे आई-वडिलांनी संपवले जीवन

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत तरूणी ही शाहबाद डेअरी परिसरातील जे. जे. कॉलनीमध्ये वास्तव्यास होती. आरोपी साहिल आणि मृत तरूणी हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. पण शनिवारी (ता. 27 मे) या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाले. त्यानंतर तरूणी रविवारी मित्राच्या वाढदिवसाकरिता जात असत, आरोपी साहिलने तिला रस्त्यात अडवले. यानंतर तिने तिच्यावर 40 वार करत तिची हत्या केली.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी फक्त तरूणीवर वार करूनच थांबला नाही तर त्याने तिला दगडाने देखील ठेचले. सदर घटना घडत असताना या ठिकाणी अनेक लोक देखील उपस्थित होते, पण त्यांतील कोणीही या सनकी तरूणाला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. तर शाहबाद पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 302 नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे. तर या घटनेची दिल्ली महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती महिवाल यांनी सांगितले की, अशी घटना यापूर्वी पाहिली नाही. पुन्हा अशाप्रकारचे कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही, असे बदल पोलीस व्यवस्थेत करण्याची आवश्यकता आहे.

‘दिल्लीच्या शाहबाद डेअरीमध्ये एका अल्पवयीन निष्पाप बाहुलीची भोसकून आणि नंतर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे दिल्लीत महिलांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर मानसिकतेच्या लोकांचे मनोबल उंचावलेले दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांना आम्ही नोटीस बजावत आहोत. कारण आता सर्व मर्यादा पार झालेल्या आहेत. माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत मी यापेक्षा भयंकर काहीही पाहिले नाही, असे ट्वीट महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -