Homeदेश-विदेशDelhi Election 2025 : दिल्लीत 5 फेब्रुवारीला होणार मतदान तर 8 फेब्रुवारीला...

Delhi Election 2025 : दिल्लीत 5 फेब्रुवारीला होणार मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी

Subscribe

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे. येत्या 5 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्लीत एकाच टप्प्यात हे मतदान आहे. देशाच्या राजधानीत होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत पूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सातत्याने निवडणूक आयोगावर होत असलेल्या आरोपांवरही भाष्य केले. (Delhi Election 2025 Election Commission declared)

हेही वाचा : Rajiv Kumar : ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही; महाराष्ट्रातील विरोधकांच्या आरोपाला निवडणूक आयुक्तांचे प्रत्युत्तर 

असा असेल कार्यक्रम

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना – 10 जानेवारी
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख – 17 जानेवारी
उमेदवारी अर्जाची छाननी – 18 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – 20 जानेवारी
मतदानाची तारीख – 5 फेब्रुवारी
मतमोजणीचा दिवस – 8 फेब्रुवारी

या पोटनिवडणुकींबाबतही घोषणा

दिल्लीसोबतच उत्तर प्रदेशमधील मिल्कीपूर या जागेवरही 5 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. तर, त्याचा निकाल हा दिल्ली निवडणुकीच्या निकालासोबतच 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. तर, जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि नगरोटा येथील पोटनिवडणुकीच्या तारखा यावेळी जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक विक्रम झाले आहेत. अनेक नवतरुणांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेतला आहे. येत्या काळातसुधा लोकशाही मजबूत करण्यासाठी टक्केवारी अधिक वाढत जाईल. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. तसेच, दिल्लीत बहुमतासाठी 36 जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे. दरम्यान, दिल्लीत 1 कोटी 55 लाख मतदार आहेत. यामध्ये 83 लाखांहून अधिक मतदार हे पुरुष आहेत. तर, राज्यात तब्बल 13 हजार 33 मतदान केंद्रे आहेत. यंदाच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, याचवेळी “प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप करण्यात आले आहेत. कोणत्याही यंत्रणेने ईव्हीएम हॅक होऊ शकत,” असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहे.