Delhi Election 2025 दिल्ली: दिल्लीतील जनता विधानसभेच्या 70 जागांसाठी आज (5 फेब्रुवारी) मतदान करत आहे. सकाळी 8 वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. मात्र, या मतदानावेळी दिल्लीतील जंगपुरा विधानसभेती एका बूथवर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे पैसे वाटल्याच्या आरोपावरून भाजप आणि आप आमनेसामने आल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Delhi Election 2025 Voters manish sisodia jungpura aap candidate bjp workers)
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीच्या जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील एका बूथवर आपचे उमेदवार आणि माजी मंत्री मनिष सिसोदीया व भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. जंगपुरा विधानसभेतील भाजप बूथला लागून असलेल्या इमारतीत मतदारांना पैसे वाटत आहे, असा आरोप आपचे उमेदवार मनिष सिसोदीया यांनी केला. हे सर्व दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली केले जात आहे. निवडणूक आयोगाने पक्षावर कारवाई करावी, अशी मागणीही सिसोदीयांनी यावेळी केली. मात्र पोलिसांनी मनिष सिसोदीया यांचे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे दिल्लीत पुन्हा आप आणि भाजप याच्यांत वादाची ठिणगी उडाल्याचं पाहायला मिळत आहे.
सिसोदियाच्या समोर मोदी मोदी चे नारे 🔥🔥😂
आरारारारा खरतरनाक चालू आहे मतदान !
दिल्लीत भगवा फडकला 💪🏻🚩#DelhiElection2025 pic.twitter.com/wSFVuRWROV
— Sachin ( Modi Ka Parivar ) (@SM_8009) February 5, 2025
एक्सवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मनिष सिसोदीया भाजपच्या बूथवर जाऊन पोलिसांना तपासणी करण्यास सांगत आहेत. पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, राकेश सागर यांच्या नावावर भाजपचे तीन टेबल कसे लागले? असा सवाल सिसोदीयांनी केला. मात्र त्यावेळी उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनिष सिसोदीया यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. तसेच, मनिष सिसोदीया आणि पोलीस यांच्यात वाद झाला.
दिल्ली पोलिसांनी दावे फेटाळले
मनीष सिसोदिया यांनी पैसे वाटल्याचे आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, गोंधळही कमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा – PM Narendra Modi : ये कैसी डुबकी है…, पंतप्रधान मोदींची गंगेत डुबकी अन् सोशल मीडियावर उधाण