नवी दिल्ली : देशातील झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून आता लवकरच दिल्लीच्या विधानसभेच्या तारखा जाहीर होणार आहेत. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच यावेळी आम आदमी पक्षाने 18 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले असून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. (Arvind kejriwal drops 18 mla in delhi election.)
हेही वाचा : Aaditya Thackeray : बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी; ठाकरेंचे सरकारवरही ताशेरे
लवकरच दिल्लीत विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या निवडणुकाची तारीख जाहीर होण्यापूर्वीच आप पक्षाकडून 31 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहे. तसेच त्यापैकी 8 जागांवर आप पक्षाला मागच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यावेळी तीन जागांवर विद्यमान आमदारांनी पक्ष सोडल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच यंदा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने पराभूत बहुतांश जागांवर जुन्या चेहऱ्यांना संधी दिली असून अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांचे तिकीट कापण्यात आले आहे.
हेही वाचा : Rohinton Fali Nariman : आधी राम मंदिराच्या निर्णयावर प्रश्न, आता न्यायमूर्तींनी EWS आरक्षणाला म्हटले चुकीचे
यंदा माजी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे दुसरे सर्वात मोठे नेते मनीष सिसोदिया यांना देखील दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी त्यांना पटपडगंजऐवजी जंगपुरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी विधानसभेच्या उपसभापती राखी बिरलान यांना मंगोलपुरीऐवजी मादीपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच दुसरी यादी जाहीर करताना दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष गोपाल राय यांनी सांगितले की, लोकांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि कामगिरीच्या आधारे तिकिटांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच 2 आमदारांच्या जागा बदलण्यात आल्या असून आतापर्यंत 18 आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. तसेच येत्या काही दिवसांमध्ये आणखी अनेक आमदारांची तिकिटे कापण्यात येऊ शकतात. अशाप्रकारे 10 वर्षांच्या सत्ताविरोधी कारभाराचा सामना करण्यासाठी पक्षाने अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. (Arvind kejriwal drops 18 mla in delhi election.)
Edited By Komal Pawar Govalkar