Homeदेश-विदेशDelhi Election : आपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आरोप

Delhi Election : आपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा आरोप

Subscribe

हरियाणाच्या निवडणुकीच्या वेळीही जागांबद्दलही आमची चर्चा झाली. आम्ही आमच्या स्थानिक नेत्यांशी बोलूया असे म्हटले. दुसऱ्या दिवशी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटले आणि त्यांनी हरियाणातील सर्व 90 जागा लढवण्याची घोषणा केली. दिल्लीतही त्यांनी तेच केले.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या, बुधवारी मतदान होणार आहे. इंडि आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढविणारे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काँग्रेस सर्व 70 जागा लढवत आहे. आम्ही चर्चेची दारे उघडी ठेवली असतानाच आम आदमी पार्टीने हरियाणाप्रमाणेच नवी दिल्लीतही सर्व जागा लढविण्याचे जाहीर करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. (Delhi Election: Senior Congress leader accuses AAP)

दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची युती होईल, अशी अटकळ होती. पण प्रत्यक्षात तसे न होता, दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला. तर, इंडि आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह इतर पक्षांनी आपला पाठिंबा दिला आहे. अशा रीतीने काँग्रेसला एकटे पाडण्याच्या धोरणाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी टिप्पणी केली आहे. आम्ही इंडि आघाडीतील मित्र पक्षांशी चर्चा केली होती, एवढेच नव्हे तर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशीही बोललो होतो. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही, असे त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संजय राऊतांचे टीकास्त्र; संसदेचा मॅरेज हॉल करुन टाकला

इंडि आघाडीतील इतर घटक पक्षांनी काँग्रेसचा प्रस्ताव नाकारला का? असा प्रश्न विचारला असता, काँग्रेसचे राज्यसभा सदस्य अजय माकन म्हणाले की, आम्ही इंडि आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा केली होती. आम्हाला साथ देत तटस्थ राहण्याचे आवाहनही त्यांना केले होते. पण त्यांनी आमचे ऐकले नाही, म्हणूनच आज ते आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहेत.

दिल्ली निवडणुकीमध्ये युती करण्यासाठी आम्ही अरविंद केजरीवाल यांच्याशीही संपर्क साधला होता. हरियाणाच्या निवडणुकीच्या वेळीही जागांबद्दलही आमची चर्चा झाली. आम्ही आमच्या स्थानिक नेत्यांशी बोलूया असे म्हटले. दुसऱ्या दिवशी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सुटले आणि त्यांनी हरियाणातील सर्व 90 जागा लढवण्याची घोषणा केली. दिल्लीतही त्यांनी तेच केले. आम आदमी पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला. (Delhi Election: Senior Congress leader accuses AAP)

हेही वाचा – Munde on radar : बीडच्या त्या कामांची होणार पक्षांतर्गत चौकशी, खुद्द अजित पवारांनी दिले आदेश