घरताज्या घडामोडीDelhi Fire : दिल्लीतील अग्नितांडवात २७ लोकांचा होरपळून मृत्यू, आग नियंत्रणात

Delhi Fire : दिल्लीतील अग्नितांडवात २७ लोकांचा होरपळून मृत्यू, आग नियंत्रणात

Subscribe

दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळ एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. त्यामुळे 27 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर 8 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच इमारतीत काम करणाऱ्यांचे कुटुंबीय आपल्या कुटुंबीयांच्या शोधात इकडे तिकडे फिरत आहेत. आग नियंत्रणात आणली आहे. परंतु कुटुंबीयांचा आक्रोश सुरु आहे.

दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्थानकाजवळ एका तीन मजली व्यावसायिक इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पण या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश अजूनही सुरूच आहे, काल संध्याकाळपासूनच काही लोकं आपल्या कुटुंबीयांच्या शोधात आहेत. त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत १०० लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इमारतीमध्ये सध्या ३० ते ४० लोकं अडकल्याची शक्यता असल्याचे चीफ फायर ऑफिसर अतुल गर्ग यांनी सांगितले.

- Advertisement -

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १०० कर्मचाऱ्यांची बचाव टीम घटनास्ठळी तैनात करण्यात आली होती. आगीच्या घटनेची माहिती मिळताच २७ अग्रिशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फायर डिपार्टमेंटची एक टीम इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सर्च ऑपरेशन करत आहे. बचाव करताना २ कर्मचाऱ्यांचा देखील होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

कंपनीचा मालक ताब्यात

कंपनीचा मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. आगीच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून देण्यात येणार आहेत. तर जखमींना ५० हजारांची मदत करण्यात येणार आहे.

जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन लोकांच्या उड्या

इमारतीला आग लागल्यावर काही लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. यावेळी अनेक लोकांनी इमारतीवरुन खाली उडी मारली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पहिल्या मजल्यावर आगीला सुरुवात झाल्यामुळे धावाधाव सुरु झाली होती. जखमींना संजय गांधी रुग्णालयातून आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत असल्याचे नातेवाईक सांगत आहेत. त्याचवेळी रुग्णालयात जाऊनही माहिती मिळत नसल्याने आपल्या कुटुंबीयांच्या शोधात अनेक नातेवाईक आहेत.


हेही वाचा : ओबीसी आरक्षण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -