घरताज्या घडामोडीदिल्लीमध्ये कोरोना रूग्णांच्या अहवालाची होणार जीनोम सिक्वेंसिंग, ओमिक्रॉनमुळे दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

दिल्लीमध्ये कोरोना रूग्णांच्या अहवालाची होणार जीनोम सिक्वेंसिंग, ओमिक्रॉनमुळे दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

ओमिक्रॉनमुळे दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कारण दिल्लीमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या अहवालाची जीनोम सिक्वेंसिंग होणार असल्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. जे कोरोना बाधित रूग्ण आहेत. त्यांचे अहवाल जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचसोबतच केजरीवाल सरकारने केंद्र सरकारला बूस्टर डोज देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

दिल्लीच्या सरकारने मोठा निर्णय घेतला असून कोरोना काळात फ्री रेशन आणि सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आलं आहे. आता फ्रीमध्ये रेशन ३१ मार्चपर्यंत देण्यात येणार आहे. पदेशातून आलेल्या प्रवाशांची जीनोम सिक्वेसिंग करण्यात आली होती. त्यामध्ये काल (रविवार) १०० हून अधिक कोरोना रूग्ण आढळले असून दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०० हून अधिक रूग्ण सापडल्यामुळे दिल्लीतील नागरिकांमध्ये भयावह वातवरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

जीनोम सिक्वेसिंग काय आहे?

डीएनए आणि आरएनए आणि Genetic Material यांसारख्या पदार्थांना सामूहिक रूपात जीनोम असं म्हणतात. एक जीनशिवाय दुसऱ्या जीनमध्ये परस्पर व्यवहार आणि डिस्टन्स यांसारख्या गोष्टी समझण्यासाठी अनेक प्रकारांमध्ये जीनोम सिक्वेंन्सिंग केली जाते. जीनोमच्या मॅपिंगमुळे जीनोममध्ये कशा पद्धतीचे बदल होतात. यांसारखी माहिती समोर येते.


हेही वाचा : Omicron Variant : भारतात पुढील काही महिन्यांत ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता, AIIMS च्या डॉक्टरांचे संकेत

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -