Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Delhi CoronoVirus: 'या' दोन राज्यातून दिल्लीत येणाऱ्या नागरिकांसाठी १४ दिवस क्वारंटाईन बंधनकारक

Delhi CoronoVirus: ‘या’ दोन राज्यातून दिल्लीत येणाऱ्या नागरिकांसाठी १४ दिवस क्वारंटाईन बंधनकारक

Related Story

- Advertisement -

दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या बाधितांचा आकडा लक्षात घेता केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, आता दिल्लीत नागरिकांसाठी अधिक कठोर निर्बंध करण्यात आले आहे. दिल्लीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना तो संसर्ग नियंत्रणात रहावा म्हणून आंध्रप्रदेश आणि तेलंगना या दोन राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन राहणं, बंधनकारक असणार आहे. याकरता केजरीवाल सरकारकडून सरकारी आणि पेड क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

यासोबतच दिल्लीत येणाऱ्या नागरिकांपैकी ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले असतील त्यांना दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा गेल्या ७२ तासांतील RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं आवश्यक असणार आहे. यासह ज्या नागरिकांकडे RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहणं बंधनकारक आहे. जर कोणत्या नागरिकांकडे होम क्वारंटाईनची व्यवस्था नसेल कर ते सरकारद्वारा उपलब्ध असलेल्या सरकारी किंवा पेड क्वारंटाईन सुविधेमार्फत ७ दिवसांपर्यंत क्वारंटाईन राहू शकतात.

- Advertisement -

यासोबतच, आंध्रप्रदेश आणि तेलंगना या दोन राज्यांतून तुम्ही बस, ट्रेन, विमान किंवा कार यासारख्या कोणत्याही मार्गाने दिल्लीत प्रवेश करत असाल तर तुम्हाला दिल्लीतील या नव्या नियमांचे पालन करणं आवश्यक असणार आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगनामध्ये कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळल्यानंतर दिल्ली सरकारने या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. जो कोणताही नागरिक या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करेल त्याला ७ दिवसांसाठी सरकारी इंस्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आंध्र आणि तेलंगणा या दोन राज्यातील नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करतील, याची जबाबदारी निवासी आयुक्तांची असणार आहे. दरम्यान, दिल्लीत गेल्या २४ तासांत १९ हजार १३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २० हजार २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ९० हजार ९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -