घरCORONA UPDATECorona: दिल्लीचे आरोग्य मंत्री अत्यावस्थ; ठेवले ऑक्सिजन सपोर्टवर

Corona: दिल्लीचे आरोग्य मंत्री अत्यावस्थ; ठेवले ऑक्सिजन सपोर्टवर

Subscribe

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती अत्यावस्थ झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्य फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाले असून त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. आरोग्य मंत्र्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले असून त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाच्या कार्यालयाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी जूनला त्यांचा ताप कमी झाला. मात्र त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले.

- Advertisement -

सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास 

आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची १६ जून रोजी प्रकृती बिघडली होती. त्यांना ताप आला होता तर श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र १७ जून रोजी केलेली त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशलिस्ट रुग्णालयात उपचार सुरु झाले. काल त्यांच्या प्रकृतीत थोड्या प्रमाणात सुधारणा झाली असली तरी त्यांचा ताप कमी झालेला नाही. एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा –

इगतपुरी शहर पाच दिवस कडकडीत बंद राहणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -