दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना 9 जूनपर्यंत ईडी कोठडी

मनी लांड्रिंग प्रकरणात अटक झालेले दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) 9 जून पर्यंत ईडीच्या ताब्यात (ED custody) असनार आहेत. या बाबत न्यायालयाने आदेश दिले आहेत. ईडीने न्यायालयाकडे सत्येंद्र जैन यांची 14 दिवसांची ईडी कोठडी मागीतली होती.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ईडीची बाजू मांडली. 2015 ते 2017 दरम्यान सीबीआय आणि आयटीने बेहिशोबी मालमत्ता आणि हवालाद्वारे पैसे उभारल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी कोठडी आवश्यक आहे. रजिस्ट्रीमध्ये पैसे चेकने दिल्याचे सांगितले मात्र, प्रत्यक्षात रोख व्यावहार केला गेला. कलम 19 अतर्गत जैन (Satyendra Jain) यांना अटक करण्यात आले आहे. जैन यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. यासाठी आम्हाल 14 दिवसांची ईडी कोठडी हवी आहे. आम्हाला हवालाच्या माध्यमातून आलेला पैसा सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा होता का आणखी कोणाचा होता याची चौकशी करायची आहे. जैन यांनी उपस्थित करण्यात आलेल्या साक्षींवर कोणतेही समाधान कारक उत्तर दिलेले नाही.

दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने सोमवारी अटक केली. ईडीने त्याला कोलकाता येथील एका कंपनीच्या हवाला व्यवहाराच्या प्रकरणात अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी काही तासांच्या चौकशीनंतर जैन यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMPL) कलमांतर्गत ताब्यात घेतले .