घरताज्या घडामोडीमहिलेला २३ आठवड्यांच्या जुळ्या मुलांचे गर्भपात करण्यास दिल्ली हायकोर्टाची परवानगी

महिलेला २३ आठवड्यांच्या जुळ्या मुलांचे गर्भपात करण्यास दिल्ली हायकोर्टाची परवानगी

Subscribe

दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी एका महिलेला २३ आठवड्यांच्या जुळ्या मुलांचे गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. माहितीनुसार या महिलेच्या गर्भात मानसिक विकृत असलेली जुळी मुलं वाढत होती. एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालाचा विचार करून दिल्ली हायकोर्टाने हा महत्त्वाचा आदेश दिला आहे. एम्सद्वारे स्थापन केलेल्या मेडिकल बोर्डाने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, ‘महिलेच्या गर्भाशयात असलेली जुळी मुलं मानसिक विकृत ग्रस्त आहेत. त्यामुळे जर या मुलांना जन्म दिला तर दीर्घकाळासाठी त्यांच्या विकासासंबंधित समस्यांचा सामना करावा लागेल.’

न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, ‘आता महिलेचे गर्भपात केल्यास तिला कोणताही धोका होणार नाही.’ त्यानंतर सर्व बाबींवर विचार केल्यावर महिलेला गर्भपात करण्याची परवानगी दिली. तसेच महिलेल्या वतीने दाखल केलेली याचिका निकाली काढण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महिला आणि तिचा नवरा दोघेही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे उपस्थित होते. त्यांनी हायकोर्टाला गर्भपाताशी संबंधित जोखमीची जाणीव असल्याचे सांगितले.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात महिलेने हायकोर्टात गर्भपात करण्यास परवानगी मिळण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. महिलेने याचिकेत म्हटले होते की, ‘तिची जुळी मुलं ‘डँडी वॉकर विकृती’ने ग्रस्त आहेत. ही एक दुर्मिळ घटना आहे.’ महिलेच्या याचिकेनंतर हायकोर्टाने एम्स मेडिकल बोर्डची स्थापना करणे आणि महिलेची तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. दरम्यान महिलेला २८ एप्रिलला समजले की, तिच्या गर्भातील जुळी मुलं मानसिक विकृत आहेत. हायकोर्टाला सांगितले त्यांनी होते की, ‘त्यांच्या डॉक्टरांनी याबाबत पहिल्यांदाच शक्यता वर्तवली होती, परंतु अहवालाच्या प्रतिक्षेत होतो. अंतिम अहवाल मिळल्यानंतर या आजाराबाबत समजले आणि हा एक दुर्मिळ आजार असून तो बरा होत नसल्याचे देखील समजले. तसेच या आजारात मुलांचा विकास होत नाही आणि मुलं कधी सामान्य होऊ शकत नाही, अशा गोष्टी समजल्या.


हेही वाचा – Viral Video: पाण्याच्या टँकमध्ये अडकून हत्तीचे पिल्लू तडफडत राहिले, सुदैवाने वाचवले प्राण

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -