उमर खालिदचे भाषण आक्षेपार्ह असले तरी ते दहशतवादी कृत्य नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचं मत

Delhi High Court has ruled that Umar Khalid's speech was not a terrorist act
उमर खालिदचे भाषण आक्षेपार्ह असले तरी ते दहशतवादी कृत्य नाही - दिल्ली उच्च न्यायालय

जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला17 फेब्रुवारी 2020 रोजी UAPAअंतर्गत अटक केले होते. तेव्हापासून उमर खलिद तुरुंगात असून या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने एक मोठे विधान केले आहे. उमर खालिदचे अमरावतीतील भाषण आक्षेपार्ह असले तरी ते दहशतवादी कृत्य नव्हते, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उमर खालिद याच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे विधान केले आहे. ट्रायल कोर्टाने 24 मार्च रोजी उमर खलिदचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर खलिदच्या वकिलांनी ट्रायल न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

ते दहशतवादी कृत्य ठारत नाही –

यावेळी उमर खालिदचे भाषम आक्षेपार्ह आहे. म्हणून ते दहशतवादी कृत्य ठरत नाही. हे आम्हाला चांगलेच समजते, असे न्यायालयाने म्हटले आहे. संबंधित भाषण किती आक्षेपार्ह होते? यावर खटला भरला तर तो संविधानाच्या चौकटीत गुन्हा ठरणार नाही, अशी टीप्पणी न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि रजनीश भटनागर यांच्या खंडपीठाने केली आहे.

खालिदचा युक्तिवाद ऐकण्यासाठी 4 जुलै तारीख –

उमर खालिदचे भाषण आक्षेपार्ह, अप्रिय आणि मानहानी करण्यासारखे असू शकते. मात्र, ते दहशतवादी कृत्य ठरत नाही. खालिदने 17 फेब्रुवारी 2020 ला अमरावतीत भाषण केले होते. या प्रकणात न्यायालयाने उमर खालिदचा युक्तिवाद ऐकण्यासाठी 4 जुलैची तारीख दिली आहे