घरताज्या घडामोडीफेसबुक सोडू शकत नसाल तर नोकरी सोडा, लष्करी अधिकाऱ्याला हायकोर्टाचा सल्ला

फेसबुक सोडू शकत नसाल तर नोकरी सोडा, लष्करी अधिकाऱ्याला हायकोर्टाचा सल्ला

Subscribe

लष्कराने अधिकारी आणि जवानांना ८९ Apps वापरायला बंदी घातली आहे. याविरोधात एका लेफ्टनंट कर्नलने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. लष्करी सेवेत असताना फेसबुक वापरण्याची परवानगी देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. पण देशाचा सुरक्षेचा मुद्दा असेल तर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच फेसबुक सोडू शकत नसाल तर नोकरी सोडा असा दिल्ली हायकोर्टाने सल्ला देखील लष्करी अधिकाऱ्याला दिला आहे.

भारतीय लष्कराने आपल्या सर्व जवानांसाठी बऱ्याच मोबाईल Appsवर बंदी घातली होती. यामध्ये एकूण ८९ मोबाईल Apps असून त्यात फेसबुक, टिकटॉक आणि इन्स्टाग्रामचा समावेश आहे. या बॅन केलेल्या Appsना १५ जुलैपर्यंत आपापल्या फोनमधून डिलीट करण्यास भारतील लष्कराने जवानांना सांगितले होते. दरम्यान हे ८९ Apps मध्ये फक्तसोशल मीडिया Appsच नाही तर बरेच गेमिंग आणि ई-कॉमर्सच्या Appsचा समावेश आहे.

- Advertisement -

भारतीय लष्कराच्या या बंदी विरोधात एका लेफ्टनंट कर्नलने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळेस हायकोर्टाने सांगितले, सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय लष्कराने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या वापरावर बंदी घातली. न्यायमूर्ती राजीव सहाय आणि न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठाखाली या याचिकेवर सुनावणी करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – शिकण्याची जिद्द असेल तर जगण्याला नवी उर्जा मिळते – पंतप्रधान मोदी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -