white fungus covid: पांढऱ्या बुरशीमुळे कोरोनाबाधित महिलेच्या आतड्यात झाली छिद्रे

Delhi hospital reports 'first-ever' case of white fungus causing severe damage to intestine
white fungus covid: पांढऱ्या बुरशीमुळे कोरोनाबाधित महिलेच्या आतड्यात झाली छिद्रे

देशात कोरोना नंतर जास्त धोकादायक आजार म्युकरमायकोसिस पसरत आहे. माहितीनुसार ११ हजारांहून अधिक म्युकरमाकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आता पांढऱ्या बुरशीचे धोकादायर रुप समोर आले आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये पांढऱ्या बुरशीमुळे कोरोनाबाधित रुग्णाच्या आतड्या छिद्र झाल्याची पहिला घटना समोर आली आहे. रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी अँड पेन्क्रिएटिकोबिलरी सायन्सचे (Gastroentrology and Pencreaticobiliary Sciences) अध्यक्ष डॉ. अनिल अरोरा म्हणाले की, ‘कोरोनबाधितांमध्ये पांढऱ्या बुरशीमुळे अन्ननलिका, लहान आतडे आणि मोठे आतडे यामध्ये अनेक छिद्र होण्यासारखी प्रकरण कधीच समोर आले नाही आहे.’

त्यांनी पुढे सांगितले की, ‘१३ मेला ४९ वर्षीय महिलेच्या पोटात तीव्र वेदना, उल्टी होणे आणि बद्धकोष्ठता झाल्यामुळे एसजीआरएमध्ये दाखल केले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ब्रेस्ट कॅन्सरमुळे त्यांचे स्तन काढले होते आणि चार आठवड्यांपूर्वी केमोथेरेपी झाली होती. महिलेच्या पोटाचे सीटीस्कॅन केल्यानंतर समजले की, ‘आतड्यात छिद्र झाल्यामुळे पोटात पाणी आणि हवा आहे. लगेच दुसऱ्या दिवशी महिलेची शस्त्रक्रिया केली. यावेळेस अन्ननलिकेच्या खालच्या भागात छिद्र आढळले. लहान आतड्याच्या एका भागात गँगरीन झाल्यामुळे तो भाग काढून टाकण्यात आला.’

दरम्यान महिलेच्या शरीरात अँटीबॉडीचे प्रमाण अधिक आढळले आहे. महिलेमध्ये पांढरी बुरशी आढळल्यामुळे तिला अँटी फंगल औषध दिले गेले होते. ज्यामुळे तिची प्रकृती खूप चांगली आहे.

डॉ. अरोरा म्हणाले की, ‘कोरोना नंतर काळ्या बुरशीची प्रकरणे समोर आली आहेत. परंतु पांढऱ्या बुरशीमुळे आतड्यामध्ये गँगरीन आणि अन्ननलिकामध्ये छिद्र झाल्याचे प्रकरण यापूर्वी कधीच समोर आले नाही.’


हेही वाचा – Antibody Cocktail : देशात अँडीबॉडी कॉकटेलने कोरोना रुग्णावर पहिल्यांदा यशस्वी उपचार