संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन आणि वाद; जाणून घ्या सविस्तर

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घघटनावरुन वाद सुरु झालाय. 28 मे रोजी होणाऱ्या संसदेचं उद्धाटन राष्ट्रपतींनी करावं अशी विरोधकांची मागणी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत ही मागणी केली होती . त्यानंतर अनेक विरोधी नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. राष्ट्रपतींना या नव्या वास्तूचं उद्घाटन करु न देणं हा राष्ट्रपतींचा अपमान असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

Delhi Inauguration of new Parliament building and debate Know in detail
Delhi Inauguration of new Parliament building and debate Know in detail

देशाच्या संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन 28 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आता यावरुन कॉंग्रेसने आक्षेप घेतलाय आणि इथूनच वादाची पहिली ठिणगी पडली. पहिला वाद असा की नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नाही तर राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावं, आणि दुसरा वाद म्हणजे तारखेवरुन. नेमकं हे प्रकरण काय आणि काय घडतयं ते पाहुया. (  Delhi Inauguration of new Parliament building and debate Know in detail )

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घघटनावरुन वाद सुरु झालाय. 28 मे रोजी होणाऱ्या संसदेचं उद्धाटन राष्ट्रपतींनी करावं अशी विरोधकांची मागणी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत ही मागणी केली होती . त्यानंतर अनेक विरोधी नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. राष्ट्रपतींना या नव्या वास्तूचं उद्घाटन करु न देणं हा राष्ट्रपतींचा अपमान असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.

तर राजकीय हव्यासापोटी मी पणा करत राष्ट्रपतींना डावललं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केलाय. विरोधकांच्या या आरोपांवर आता भाजपने उत्त्तर दिलं आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा दाखला देत भाजपने काँग्रेसला घेरलंय. 1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जून्या संसद भवनाच्या उपभवनाचं उद्घाटन केलं होतं. तसचं, 15 ऑगस्ट 1987 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचं उद्घाटन केलं होतं. तेव्हा राष्ट्रपतींचा अपमान झाला नाही का, यांच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलं तर चालतं का? असा प्रश्न भाजपचे नेते आणि मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी विचारलायं.

दुसरा वाद असा की, 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंतीय. त्यामुळे या दिवशी नव्या संसदेचं उद्घाटन म्हणजे स्वतंत्र भारताचा पाया उभारणाऱ्या महापुरुषांचा अपमान असल्याची टीका काँग्रेसने केलीय. हा वाद आता अधिक वाढतानाच दिसतोय. तृणमूल काँग्रेस, आप, आरजेडी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासह जवळजवळ 19 पक्षांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकलाय.

नवं संसद भवन हे त्रिकोणी आकाराचं आहे. हे 64 हजार 500 वर्ग मीटरमध्ये पसरललेलं आहे, तर जूनं संसद भवन हे गोलाकार असून 47 हजार 500 वर्गमीटरमध्ये पसरवलंय. भविष्यात खासदारांच्या संख्येत वाढ होणार असल्याने, या भव्य संसद भवनाची निर्मिती करण्यात आली आहे.

( हेही वाचा: नव्या संसद भवनावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका, उद्घाटनच्या कार्यक्रमावर टाकणार बहिष्कार )

जून संसद भवन हे 100 वर्ष जूनयं. त्यामुळे या भवनात आसन क्षमता, आधुनिकतेची कमी आहे, जी आताच्या भारतासाठी पुरेशी नाही. जूनं संसद भवन हे आधुनिकतेनं परिपूर्ण नसल्यानचं काँग्रेसने नव्या संसद भवनाची गरज असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता हाच काँग्रेस पक्ष नव्या संसद भवनाचा विरोध करतोय आणि या भवनाच्या उद्घाटन सोहळयावरही बहिष्कार टाकला आहे.