केजरीवाला सरकारचा प्रस्ताव नामंजुर; दिल्लीत Weekend Curfew कायम

केजरीवाल सरकारच्या प्रस्तावामध्ये ऑड-ईव्हन पद्धत बंद करण्याचा आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालू करण्यास परवानगी देण्यासाठी सांगितले होते.

Delhi L-G Rejects Kejriwal's Plea to End Weekend Curfew
केजरीवाला सरकारचा प्रस्ताव नामंजुर; दिल्लीत Weekend Curfew कायम

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दिल्लीच्या केजरीवाल सरकारने वीकेंड कर्फ्यू हटवण्यासाठी उपराज्यपाल अनिल बैजला यांना प्रस्ताव पाठवला आहे. पण आता केजरीवाला सरकारचा हा प्रस्ताव उपराज्यपाल अनिल बैजल यांनी नामंजूर केला आहे. एलजी अनिल बैजल म्हणाले की, ‘सध्या आपल्याला अजून थांबावे लागेल. जोपर्यंत नव्या कोरोनाबाधितांची वाढ नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत निर्बंध कायम ठेवले पाहिजेत.’ जरी एलजींनी वीकेंड कर्फ्यू हटवण्यात मान्यता दिली नसली तरी खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर वीकेंड कर्फ्यू हटवण्यासंबंधीत प्रस्ताव उपराज्यपालांना पाठवला होता. या प्रस्तावामध्ये ऑड-ईव्हन पद्धत बंद करण्याचा आणि खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने चालू करण्यास परवानगी देण्यासाठी सांगितले होते. यामधील दोन मागण्या फेटाळून खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता दिल्लीतला वीकेंड कर्फ्यू कायम असणार आहे. वीकेंड कर्फ्यू हा शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईप्रमाणे दिल्लीत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांनी वाढत होती. मात्र आता दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढीत घट झाली आहे. परंतु देशात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात गेल्या गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ४७ हजार २५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ७०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ५१ हजार ७७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.


हेही वाचा – India Gateवर आता उभारला जाणार सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा; वादानंतर PM Modiची घोषणा