दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीचे नाव; आप नेत्याला 100 कोटी दिल्याचा आरोप

delhi liquor scam cm kcrs daughter kavita named accused of giving rs 100 crore to aap leaders

दिल्ली दारू घोटाळ्यात आता नवा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी चंद्रशेखर यांची मुलगी आणि आमदार के. कविता यांचे नाव समोर आले आहे. बुधवारी ईडीने तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे. कविता यांच्यावर आप नेत्यांना 100 कोटी रुपये मिळवून दिल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यात आपले नाव समोर येताच कविता यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत, तिथे ईडी आणि सीबीआय पंतप्रधान मोदींच्या आधी पोहोचतात, असा आरोप कविता यांनी केला आहे.

कविता यांच्यावर आप नेत्यांना 100 कोटी दिल्याच्या आरोपावरून ईडीने बुधवारी गुरुग्रामचे व्यावसायिक अमित अरोरा यांना अटक केली. अमित अरोरा हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते बडी रिटेल प्रा.लि.चे संचालक आहेत. कोर्टात सादर केलेल्या अहवालात ईडीने म्हटले की, अमित अरोरा यांनी चौकशीदरम्यान टीआरएस नेत्याचे नाव उघड केले. बुधवारी न्यायालयाने त्यांना 7 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

कविता या दक्षिण गटातील एक प्रमुख नेत्या आहेत. त्यांनी दिल्लीतील आप सरकारच्या नेत्यांना इतर उद्योगपतींमार्फत 100 कोटी रुपये दिले. एजन्सीने निदर्शनास आणून दिले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएसह किमान 36 आरोपींनी कथित घोटाळ्यातील हजारो कोटींच्या किकबॅटचे पुरावे लपवण्यासाठी 170 फोन नष्ट केले.

कविता यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. 2014 मध्ये त्यांनी जम्मू काश्मीर आणि तेलंगणा भारताचा भाग नसल्याचे म्हटले होते. जम्मू काश्मीरचा काही भाग आपल्या मालकीचा नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण बळजबरीने हक्क मिळवून तो आपल्यात विलिन करुन घेतला. आपण आंतरराष्ट्रीय सीमा पुन्हा आखून पुढे जायला हवे, कविता यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला होता. यानंतर त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान 2010 मध्ये तेलंगणाबाबतच्या मुद्द्यावर तयार करण्यात आलेल्या अदुरस चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी कविता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


महाराष्ट्रातर्फे लोकसभा प्रवास योजनेला आजपासून सुरुवात, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती