घरक्राइमसिंघू बॉर्डरवर तरुणाची निर्घृण हत्या, बॅरिकेट्सला बांधून मुंडक धडापासून केल वेगळं

सिंघू बॉर्डरवर तरुणाची निर्घृण हत्या, बॅरिकेट्सला बांधून मुंडक धडापासून केल वेगळं

Subscribe

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या सिंघू बॉर्डवर (Singhu Border) एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मृत तरुणाची हत्या (young man) करुन त्याचे हात कापून बॅरिकेट्सला (cutting off his hand)लटकवण्यात आला होता. तर मुंडकही मानेपासून लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेह brutal murder) सापडल्यानंतर सिंघू सीमेवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती,

सुरुवातीला आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना मुख्य स्टेजजवळ जाऊ दिल नाही. मात्र नंतर कुंडली पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी मृतदेह खाली उतरवत सिव्हिल रुग्णालयात दाखल केला.

- Advertisement -

सिंघू बॉर्डरवर आंदोलकांच्या मुख्य स्टेजजवळ सकाळच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. या मृत तरुणाचे वय जवळपास ३५ वर्षांच्या आसपास आहे. तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. तसेच त्याचा हात मनगटापासून कापून वेगळा केला आहे. याशिवाय मानेवर देखील शस्त्राने घाव घालत मान धडापासून वेगळी केली आहे. या खुणाचा आरोप निहंग्यांवर केला जात आहे.

ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. इतकेच नाही तर हत्या करुन मृत तरुणाचा मृतदेह जवळपास १०० मीटरपर्यंत फरफटत नेण्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मृतदेहाला बॅरिगेट्सवर अत्यंत दयनीय अवस्थेत लटवण्यात आले. शुक्रवारी सकाळी आंदोलकांना मुख्य स्टेजजवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

गेल्या ९ माहिन्यांहून अधिक काळ दिल्ली, हरियाणा, आणि उत्तरप्रदेश अशा वेगवेगळ्या सीमेवर तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठकाही झाल्या, पण आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. मात्र शेतकऱ्यांनी कृषी कायदा मागे घेत नाही तोवर आंदोलनाच्या स्थळावरून हलणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.


आयकर विभागाने करदात्यांना पाठवले ८४,७८१ कोटी, तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -