घरताज्या घडामोडीदिल्ली महापालिकेत पुन्हा भाजपा आणि आपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी

दिल्ली महापालिकेत पुन्हा भाजपा आणि आपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी

Subscribe

दिल्ली महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीवरून गदारोळ झाला. भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये काल रात्री बाचाबाची झाली. त्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्ली महापालिकेत भाजपा आणि आपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

दिल्ली महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीवरून गदारोळ झाला. भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये काल रात्री बाचाबाची झाली. त्यानंतर आज पुन्हा एकदा दिल्ली महापालिकेत भाजपा आणि आपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (delhi mayor election 2023 fierce scuffle between councilors in mcd house aap and bjp leaders clash over standing committee election)

दिल्ली महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीवरून गदारोळ झाला. आम आदमी पार्टी आणि भाजपचे नगरसेवक सभागृहात आमने-सामने आले. याच्या निषेधार्थ आपच्या नगरसेवकांनी काल आंदोलन केले. मात्र मोठ्या संघर्षानंतर आम आदमी पार्टीने दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे.

- Advertisement -

आपच्या उमेदवार शैली ओबेरॉय दिल्लीच्या महापौर बनल्या आहेत. बुधवारी संध्याकाळी झालेल्या निवडणुकीत त्यांना 150 मते मिळाली, तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना केवळ 116 मते मिळाली. निवडणुकीत एकूण 266 मतदार होते. मात्र, महापालिकेच्या स्थायी सदस्यांच्या निवडीबाबत सभागृहात अद्यापही गदारोळ सुरू आहे.

दिल्ली महानगरपालिकेत बुधवारी मध्यरात्री तुफान गोंधळ झाला. मध्यरात्री दोननंतरही हा गदारोळ सुरु होता. बुधवारी महापौर उपमहापौर यांच्या निवडणुकीनंतर हा हंगामा सुरु झाला. या गोंधळानंतर अनेक नगरसेवक सभागृहातच झोपले. आपचे नगरसेवक संजय सिंह यांनी रात्री 1 वाजल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपवर गोंधळाचे गंभीर आरोप केले.

- Advertisement -

स्थायी समितीच्या निवडणुकीवरुन गदारोळ

या दोघांवर झालेल्या निवडणुकीनंतर एमसीडीच्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीची वेळ आली तेव्हा गदारोळ सुरु झाला. प्रचंड गदारोळामुळे एमसीडी सभागृहाचे कामकाज पुन्हा एकदा तहकूब करण्यात आले. महापौर डॉ. शेली ओबेरॉय आपल्या जागेवरून उठल्या. मात्र, रात्रभर जावो की उद्या सकाळ, स्थायी समिती सदस्य निवडून आल्यानंतर तिथेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – मोदी तेरी कब्र खुदेगी, आरोपावर पंतप्रधानांचा पलटवार; म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -