घरताज्या घडामोडीकेबलच चोरीला, दिल्लीची मेट्रो सेवा ठप्प

केबलच चोरीला, दिल्लीची मेट्रो सेवा ठप्प

Subscribe

दिल्ली मेट्रोची ब्लू लाईन सर्व्हिस आज सकाळी ८ वाजल्यापासून ठप्प आहे. त्यामुळे यमुना बँक ते इंद्रपस्थ या मार्गादरम्यान मेट्रो उशीरा धावत असल्यामुळे येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु यामध्ये तांत्रिक अडचण असल्याचे सांगितले जात आहे. परंतु डीएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, केबल चोरिला गेल्यामुळे कालपासून दिल्ली मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच यामध्ये दुरूस्तीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

डीएमआरसीने म्हटले आहे की, इंद्रप्रस्थ आणि यमुना बँक स्थानकांदरम्यानची मेट्रो सेवा सकाळपासून विस्कळीत झाली आहे. वैशाली/नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन लाईनवर केबल चोरीच्या संशयित प्रकरणामुळे हे घडले आहे. रात्री मेट्रो सेवा बंद केल्यानंतरच ती पूर्ववत करता येईल, असेही डीएमआरसीने म्हटले आहे. चोरीचे ठिकाण शोधून वायर बदलण्यासाठी ३ तास लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

ब्लू लाईनवर धावणाऱ्या गाड्यांबाबत घोषणा करण्यात आली आहे. डीएमआरसीनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना माहिती दिली आहे. नोएडा ते द्वारका सेक्टर २१ला जोडणाऱ्या अत्यंत व्यस्त मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्यामुळे लोकांना ऑफिसला जाण्यास उशीर झाला.सोशल मीडियावर अनेक युजर्सनी आपल्या समस्या शेअर केल्या आहेत. अलीकडच्या काळात ब्लू लाईनवर अनेक समस्या आढळून येत आहेत.


हेही वाचा : नुपूर शर्माच्या हत्येसाठी पाकिस्तानातून घुसखोरी, राजस्थानात बीएसएफची मोठी कारवाई

- Advertisement -

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -