दोन हजाराची नोट उचलण्यासाठी तिने मारली धावत्या मेट्रोसमोर उडी

दोन हजाराची नोट मेट्रोच्या ट्रॅकवर पडल्यामुळे तरुणीने धावत्या मेट्रो समोर उडी मारण्याची घटना घडली आहे. याघटनेनंतर तरुणी आत्महत्या करत असल्याचा संभ्रम इतर प्रवाशांमध्ये पसरला होता.

delhi-metro
प्रातिनिधिक फोटो

दिल्ली मेट्रो रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन हजाराची नोट उचलण्यासाठी एका तरुणीने धावत्या मेट्रो समोर उडी मारली. आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे. दिल्ली मेट्रो स्टेशनवर असलेल्या लोकांना या घटनेने आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही दोन हजारची नोट तिच्याच पाकिटातून पडली होती. या घटनेनंतर स्टेशनवर असलेल्या लोकांची एकच गर्दी या मुलीकडे जमली होती. अनेकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर अनेकांनी तिला ओरडा दिला. मात्र मेट्रो अधिकाऱ्यांनी या घटनेनंतर मुलीची चौकशी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

कसा घडला प्रकार

दिल्ली ब्ल्यू लाइन मेट्रो सर्व्हिसच्या स्थानकावर आज सकाळी ही मुलगी प्रवास करण्यासाठी आली होती. यावेळी तिच्या खिशात असलेली दोन हजाराची नोट चुकून मेट्रोच्या ट्रॅकवर पडली. ट्रेन येण्यास अवकाश असल्यामुळे तिने नोट काढण्यासाठी मेट्रोच्या ट्रॅकवर उडी मारली. त्याच वेळी समोरून मेट्रो येत होती. या तरुणीने आत्महत्या करण्यासाठी उडी मारली असल्याचा समज इतर प्रवाशांचा झाला होता. त्यामुळे प्रवाशांना आरडा ओरड सुरु केली. मात्र तिने नोट उचलून तात्काळ स्टे्शनवर परत आली. या घटनेत तिला किरकोळ ईजा झाली असल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.