घरताज्या घडामोडीदिल्लीत तेरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, गुप्तांगात कात्रीने भोसकले

दिल्लीत तेरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, गुप्तांगात कात्रीने भोसकले

Subscribe

संपूर्ण देश कोरोना संकटाशी झुंज देत असतानाच देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत एका तेरा वर्षीय मुलीवर तिच्याच घरात सामूहिक बलात्कारानंतर भयंकर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. विशेष म्हणजे शु्द्धीत आल्यानंतर पीडित मुलीने रक्ताळलेल्या अवस्थेत फरफटत शेजाऱ्यांकडून मदत मागितली.  त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, पीडीतेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. तिने दिलेल्या जबाबानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पीडितेचे कुटुंब मूळचे बिहारचे असून कामानिमित्त दिल्लीत स्थलांतरीत झाले आहे. पीडितेचे आई वडील व बहिण बाजूच्याच कंपनीत मजूराचे काम करतात. त्यामुळे पीडिता दिवसभर घरात एकटीच असायची. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मंगळवारीही ती घऱात एकटीच होती. यादरम्यान दोन तरुण तिच्या घरात घुसले व त्यांनी तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यास तिने विरोध करताच त्यांनी तिला बेदम मारहाण करत कात्रीने शरीरभर भोसकले. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारात बेशुद्ध झालेली पिडीता मृत झाल्याचे समजून आरोपींनी तिथून पळ काढला.

- Advertisement -

त्यानंतर बऱ्याच तासांनी मुलीला शु्दध आली. गंभीर जखमी रक्ताळलेल्या अवस्थेत ती फरफटत दरवाजापर्यंत गेली. कसाबसा दरवाजा उघडून तिने मदतीसाठी शेजाऱ्यांना आवाज दिला. तिची अवस्था बघून सगळेच हादरले. त्यांनी तिला ताबडतोब रु्गणालयात दाखल केलं. दरम्यान मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत दोन आरोपींची नावे सांगितली आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.याप्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -